अधिकारी, कर्मचारी ठरणार अतिरिक्त

By admin | Published: January 31, 2016 11:32 PM2016-01-31T23:32:53+5:302016-01-31T23:36:21+5:30

आंदोलनाचा पवित्रा : आज होणार द्वारसभा

Additional officers, officers, employees | अधिकारी, कर्मचारी ठरणार अतिरिक्त

अधिकारी, कर्मचारी ठरणार अतिरिक्त

Next

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन झाले तर येथील विद्यापीठ फंडातील आणि रोजंदारीवरील कर्मचारी अतिरिक्त ठरून त्यांची नोकरी जाण्याची भीती निर्माण झाली आहेच शिवाय विद्यापीठ विभाजनाचा निर्णय संयुक्तिक नसल्याची भूमिका आरोग्य विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
वास्तविक आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे प्रशस्त जागा आहे. साधनसामुग्रींनीयुक्त अशी इमारत येथे असताना नव्या विद्यापीठावर कोट्यवधींचा खर्च करणे म्हणजे शासनाच्या तिजोरीची उधळपट्टी असल्याचा आरोपही केला जात आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिक सक्षम होण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होणे अपेक्षित आहे. युती शासनाच्या काळात स्थापन झालेल्या या विद्यापीठाचे भाजपा सरकारच्या काळात विभाजन होणे दुर्दैवी असल्याची भूमिकादेखील विद्यापीठाच्या कृती समितीने घेतली आहे.
केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन मुख्यमंत्र्यांची आणि आयुष विभागाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करीत येथील कृती समितीने सोमवारी विद्यापीठासमोर दुपारी द्वारसभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Additional officers, officers, employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.