देवगाव उपकेंद्रात अतिरिक्त रोहित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:18 AM2018-03-27T00:18:17+5:302018-03-27T00:18:17+5:30
येवला - लासलगाव मतदार-संघातील देवगाव येथील ३३/११ केव्ही या उपकेंद्रामध्ये ५ एमव्हीए अतिरिक्त रोहित्र बसविण्याला मंजुरी देण्यात आली असून, ३० जूनपर्यंत हे काम करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जयंत जाधव यांनी विधान परिषद सभागृहात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावरील उत्तरात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
येवला : येवला - लासलगाव मतदार-संघातील देवगाव येथील ३३/११ केव्ही या उपकेंद्रामध्ये ५ एमव्हीए अतिरिक्त रोहित्र बसविण्याला मंजुरी देण्यात आली असून, ३० जूनपर्यंत हे काम करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जयंत जाधव यांनी विधान परिषद सभागृहात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावरील उत्तरात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. जाधव यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नात म्हटले आहे की, देवगाव येथील ३३/११ केव्ही या उपकेंद्रामध्ये ५ एमव्हीए अतिरिक्त रोहित्र बसविणे, देवगाव-विंचूर ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीचे सबलीकरण करणे तसेच येवला विधानसभा क्षेत्रातील विद्युत उपकेंद्रांमधून सिंगल फेज योजना सुरू करण्याची मागणी आहे. याबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शासनाकडे मागणी केली आहे. तसेच अद्याप कुसूर, अंगुलगाव व भरवसफाटा या ठिकाणी प्रस्तावित असलेल्या विद्युत उपकेंद्रांची कामे अद्याप झालेली नाही. मात्र याअगोदर ऊर्जा मंत्र्यांच्या दालनात मागील महिन्यात झालेल्या बैठकीत या भागातील विजेचे बहुतांश प्रश्न निकाली काढण्यात आल्याने समाधान व्यक्त केले. यावेळी बावनकुळे यांनी, देवगाव, ता. निफाड येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रामध्ये अतिरिक्त रोहित्र फेब्रुवारी २०१७ मध्ये कार्यान्वित करून येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. ३३ केव्ही देवगाव-विंचूर वाहिनीचे काम पूर्ण करून वाहिनी दि. १० फेब्रुवारी २०१८ रोजी कार्यान्वित करण्यात आली आहे. येवला क्षेत्रातील विखरणी मध्ये स्पेशल डिझाइन रोहित्र बसवून त्याद्वारे घरगुती ग्राहकांना भारनियमनाच्या काळात सिंगल फेज विद्युत पुरवठा करण्याची कामे मंजूर आहेत. इन्फ्रा- २ योजनेंतर्गत कानळद येथे (१.५ एमव्हीए) क्षमतेचे वीज उपकेंद्र मंजूर आहे. सदरच्या उपकेंद्रासाठी जागा दि. १८ जानेवारी २०१८ रोजी उपलब्ध झालेली आहे. जून २०१८ पर्यंत हे काम सुरू होईल. ३३ केव्ही देवगाव उपकेंद्रासाठी १३२ केव्ही लासलगाव उपकेंद्रातून वाहिनी कार्यान्वित झाल्यामुळे देवगाव उपकेंद्रातून भरवस फाटा परिसरात योग्य दाबाने वीजपुरवठा होण्यास मदत झाली आहे.