आडगावला घरफोडीत ९ तोळ्यांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 04:53 PM2019-08-25T16:53:16+5:302019-08-25T16:55:34+5:30

नागरी वसाहत असलेल्या या परिसरात काही दिवसांपासून पोलिसांची गस्त मंदावल्याने चोरट्यांचा उपद्रव वाढला आहे, असा आरोप नागरिकांनी करत पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.

Adegaon robbery looters | आडगावला घरफोडीत ९ तोळ्यांचे दागिने लंपास

आडगावला घरफोडीत ९ तोळ्यांचे दागिने लंपास

Next
ठळक मुद्देगस्त थंडावली; चोरटे सुसाटसोन्याचे दागिने तसेच ५० हजार रु पयांची रोकड, लुटल्याची घटना

नाशिक : आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील स्वामी समर्थनगर येथे बंद घराचा कडीकोयंड्यासह कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत लोखंडी कपाटात ठेवलेले नऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच ५० हजार रु पयांची रोकड, असा अंदाजे साडेतीन लाखांचा ऐवज लुटल्याची घटना शनिवारी (दि.२४) उघडकीस आली.
स्वामी समर्थनगरात भरवस्तीत घडलेल्या घरफोडीच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून आडगाव पोलीस ठाणे हद्दीत वाहनचोरी, उचलेगिरी, घरफोडीच्या घटना वारंवार घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले. परिसरात पोलिसांची गस्त कमी झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घरफोडीबाबत स्वामी समर्थनगर येथील प्रभुलीला रो-हाउस क्र मांक एक येथे राहणारे संजय गोसावी यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. गोसावी दाम्पत्य शिक्षक असून, गोसावी हे कामानिमित्ताने दोन दिवसांपूर्वी बाहेरगावी गेले होते. त्यांची पत्नी, मुलगी या दोघी घरी होत्या. शुक्र वारी (दि.२३) गोसावी यांच्या पत्नी व मुलगी नातेवाइकांच्या घरी झोपण्यासाठी गेल्या असता रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या रो-हाउसचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातून नऊ तोळे वजनाचे दागिने तसेच ५० हजार रु पयांची रोकड, असा ऐवज चोरून नेला. सकाळी गोसावी घरी आल्यानंतर घराचा दरवाजा कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी घरात प्रवेश केला असता कपाट उघडले व कपाटातील साहित्य जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले दिसले त्यावरून घरात घरफोडी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठत झाल्या प्रकाराबाबत माहिती देऊन घरफोडी झाल्याची तक्र ार नोंदविली. याप्रकरणी अज्ञात घरफोड्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
---
गस्त थंडावली; चोरटे सुसाट
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्या उचलेगिरी वाहनचोरी तसेच घरफोडीच्या घटना वाढल्याने नागरिक भयभीत झालेले आहे. परिसरात चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांना कामानिमित्त घराबाहेर पडणेदेखील अवघड झाले आहे. नागरी वसाहत असलेल्या या परिसरात काही दिवसांपासून पोलिसांची गस्त मंदावल्याने चोरट्यांचा उपद्रव वाढला आहे, असा आरोप नागरिकांनी करत पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: Adegaon robbery looters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.