जकात बंद झाल्याने आडगाव ट्रक टर्मिनल ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:40 AM2018-04-01T01:40:08+5:302018-04-01T01:40:08+5:30

काही वर्षांपूर्वी पाय ठेवायलाही जागा नसलेले आडगाव जकात नाका येथील ट्रक टर्मिनल आज ओस पडले आहे. कोट्यवधी रु पये खर्च करून सर्वसुविधांयुक्त वास्तु मोडकळीत निघण्याची भीती निर्माण झाली असून, मद्यपी व जुगाऱ्यांचा अड्डा बनली आहे. पूर्वीच्या काळी व्यवसाय करण्यासाठी येथे स्पर्धा असायची. लाखो रु पयांची उलाढाल होत असे पण जकात बंद झाल्यापासून आज हा परिसर ओकाबोका झालेला पहायला मिळत आहे.

Adgaon Truck Terminal Due as the octroi is closed | जकात बंद झाल्याने आडगाव ट्रक टर्मिनल ओस

जकात बंद झाल्याने आडगाव ट्रक टर्मिनल ओस

googlenewsNext

आडगाव : काही वर्षांपूर्वी पाय ठेवायलाही जागा नसलेले आडगाव जकात नाका येथील ट्रक टर्मिनल आज ओस पडले आहे. कोट्यवधी रु पये खर्च करून सर्वसुविधांयुक्त वास्तु मोडकळीत निघण्याची भीती निर्माण झाली असून, मद्यपी व जुगाऱ्यांचा अड्डा बनली आहे. पूर्वीच्या काळी व्यवसाय करण्यासाठी येथे स्पर्धा असायची. लाखो रु पयांची उलाढाल होत असे पण जकात बंद झाल्यापासून आज हा परिसर ओकाबोका झालेला पहायला मिळत आहे. रस्ते, पाणी, बांधकाम क्षेत्र व पार्किंगसाठी प्रशस्त जागा आणि मुंबई-आग्रा महामार्गाला लागून असलेल्या या वास्तुचा पर्यायी वापर करणे गरजेचे असल्याचे मत आता येथील नागरिक व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या भव्य वास्तुचा सुयोग्य वापर करावा जेणेकरून येथील विकासाला चालना मिळेल व रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. आज ट्रक टर्मिनलच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी बस्तान बसवले असून, ट्रान्सपोर्टनगर म्हणूनच एक वेगळी ओळख तयार झाली आहे. त्यामुळे मालवाहतूक गाड्यांचीदेखील नेहमीच वर्दळ असते. ट्रान्सपोर्ट व्यवसायाला पूरक व्यवसायासाठी या ट्रक टर्मिनलचा वापर होऊ शकतो. याशिवाय शहर परिसरात महामार्गाजवळ असलेले गॅरेज, वर्कशॉप व्यावसायिकांना या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न केल्यास मनपाच्या उत्पन्नात भर पडेल आणि व्यवसायवृद्धीला फायदा होईल. याशिवाय महामार्गावर सर्व्हिस रोडवर अनेक ट्रान्सपोर्ट व गॅरेज व्यावसायिकांमुळे अवजड वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. या व्यासायिकांना त्याठिकाणी सोयीची जागा उपलब्ध झाल्यास वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. या ठिकाणी कृषी व्यवसायाला पूरक असा उद्योगदेखील सुरू करता येणे शक्य आहे. त्यामुळे प्रशासनाने ओस पडलेल्या ट्रक टर्मिनलच्या वास्तुचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करावे जेणेकरून ही वास्तु वापरात येईल व उत्पन्नात भर पडेल, अशा सूचना नागरिकांनी केल्या आहेत. ट्रक टर्मिनल येथे उपाहारगृह, सुविधा गाळे म्हणजेच दवाखाना, किराणा, व इतर व्यवसायासाठी उभारण्यात आले होते. यातील अनेक गाळे आज रिक्तच आहे.
शेजारील जागेवर आरक्षण कायम
महानगरपालिकेने १८ ते २२ एकर जागा ट्रक टर्मिनलसाठी विकास आराखड्यात आरक्षित केलेली आहे. त्यापैकी ५ ते ८ एकर जागेवर ट्रक टर्मिनल उभे केले. उर्वरित ठिकाणी ट्रक टर्मिनल उभे केले नसले तरी आरक्षण कायम ठेवले. यावेळी जागा मालकांनी विकास आराखड्याच्या मंजुरीपूर्वी हरकती नोंदविल्या होत्या. शिवाय हरकतींवर झालेल्या सुनावणी दरम्यान कमिटीच्या तज्ज्ञ सदस्यांनी नागपूर महानगरपालिकेत अशी आरक्षणे हटविली असून, जागा विकसित करण्यासाठी परवानगी दिली असल्याचे सांगण्यात आले आहे, असे सांगून २० वर्षांत आरक्षण असूनही जागा ताब्यात घेतल्या नाही शिवाय नवीन विकास आराखड्यातून आरक्षण हटविले नाही. त्यामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळत नाही, अशी खंत जागा मालकांनी व्यक्त केली आहे
जागा मालकांवर अन्याय
महामार्गालगत असलेल्या इतर जागेला सोन्यासारखी किंमत असूनही आरक्षणामुळे येथील जागांची किंमत कवडीमोल ठरली आहे. त्यामुळे ‘आई जेऊ घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही’ अशी गत येथील जागा मालकांची झाली आहे. महानगरपालिका पैसे नसल्याचे कारण पुढे करत या जमिनी ताब्यात घेत नाही आणि विकसित करायला परवानगीही देत नाही. त्यामुळे येथील जागामालक कात्रीत सापडले आहे. जागा विकसित होत नसल्याने महानगर पालिकेच्या घरपट्टी व इतर माध्यमातून मिळणाºया उत्पन्नातदेखील घट होत आहे . या परिसराचा विकास त्यामुळे खुंटला आहे.

Web Title: Adgaon Truck Terminal Due as the octroi is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.