सप्तश्रृंगगडावर उद्यापासून आदिमायेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 05:36 PM2019-09-28T17:36:34+5:302019-09-28T17:36:48+5:30

कळवण : उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या आदिमाया सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवास रविवार (दि. २९) पासून सुरु वात होत आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे.

Adimai's awakening from today on the Saptashringa | सप्तश्रृंगगडावर उद्यापासून आदिमायेचा जागर

सप्तश्रृंगगडावर उद्यापासून आदिमायेचा जागर

Next

कळवण : उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या आदिमाया सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवास रविवार (दि. २९) पासून सुरु वात होत आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे.  शारदीय नवरात्रोत्सव विजयापर्यंत चालणार आहे. कावड यात्रा अर्थात कोजागिरी पौर्णिमा उत्सव १२ आॅक्टोबर ते १३ आॅक्टोबरपर्यंत होत आहे. या कालावधीत श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने तसेच विविध धार्मिक संस्थांतर्फे कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. याच कालावधीत विविध सेवाभावी संस्थांतर्फे गडावर व गडाकडे येणार्या मार्गांवर ठिकठिकाणी भाविकांना सेवा देण्यासाठी सज्ज दाखल होत आहे. रविवारी सकाळी ७ वाजता भगवतीची पंचामृत महापूजाहोणार असून सकाळी ९.३० वाजता घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवास प्रारंभ होईल.  नवरात्रोत्सव काळात दररोज सकाळी ७ वाजता श्री भगवतीची पंचामृत महापूजा होईल. नवरात्रोत्सवाचा मुख्य दिवस असलेल्या सोमवार ७ आॅक्टोंबर आश्विन शुध्द महानवमीच्या दिवशी सकाळी ७ वाजता पंचामृत महापूजा, दुपारी ४ वाजता न्यासाच्या कार्यालयात ध्वजाचे पूजन झाल्यानंतर ध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी पाटील कुटुंबीयाकडे ध्वज सुपूर्द केला जाईल व त्यानंतर ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघेल. तसेच सायंकाळी पाच वाजता सभामंडपात शतचंडी योग, होम हवन पूजा होणार आहे. याच दिवशी रात्री १२ वाजता शिखरावर कीर्र्तिध्वजाचे मानकरी
ध्वजारोहण करतील.मंगळवार, ८ आॅक्टोंबर अर्थात विजयादशमीला सकाळी दहा वाजता शतचंडी याग व पूर्णाहूती होईल व त्यानंतर गडावर दसरा साजरा करण्यात येईल.
शनिवार, १२ आॅक्टोबर रोजी कोजागिरी
पौर्णिमा उत्सावास प्रारंभ होईल. या दिवशी सकाळी ७ वा. पंचामृत महापूजा होईल. रविवार १३
आॅक्टोंबरला सकाळी ७ वाजता पंचामृत महापूजा व दुपारी साडेबारा ते रात्री ८ वाजपर्यंत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यातून ठिकठिकाणावरु न कावडीधारकांनी आणलेले जल श्री भगवती मंदिरात स्वीकारले जाईल. यानंतर भगवतीचा रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत जलाभिषेक पंचामृत महापूजा होणार आहे. दि.१४ आॅक्टोंबर रोजी सकाळी साडेसात वाजता शांतीपाठ होवून महाप्रसाद वाटपाने नवरात्रोत्सव व कोजागिरी उत्सवाची सांगता होणार
आहे.

Web Title: Adimai's awakening from today on the Saptashringa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक