आवर्तनासाठी आदिवासींचे आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 01:07 AM2019-02-06T01:07:41+5:302019-02-06T01:08:38+5:30

कळवण : बोरदैवत लघुपाटबंधारे प्रकल्पातून रब्बी पिकासाठी तत्काळ आवर्तन मिळावे या मागणीसाठी अंबिका ओझर येथील आदिवासी शेतकऱ्यांनी कळवण येथील लघुपाटबंधारे उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी पाठिंबा दिला असून, तत्काळ पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

Adivasi agitation fasting for the revolt | आवर्तनासाठी आदिवासींचे आमरण उपोषण

कळवण येथे उपोषणाला बसलेले आदिवासी शेतकरी.

Next
ठळक मुद्देशिवसेनेचा पाठिंबा : गेट नादुरु स्त असल्याने पाणी सोडण्यास अडचणी

कळवण : बोरदैवत लघुपाटबंधारे प्रकल्पातून रब्बी पिकासाठी तत्काळ आवर्तन मिळावे या मागणीसाठी अंबिका ओझर येथील आदिवासी शेतकऱ्यांनी कळवण येथील लघुपाटबंधारे उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी पाठिंबा दिला असून, तत्काळ पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, लघुपाटबंधारे प्रकल्पाचे उपअभियंता अभिजित रौंदळ यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मागण्यांसंदर्भात चर्चा केली. पाणी सोडण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले; परंतु गेट नादुरु स्त असल्याने पाणी सोडण्यात अडचणी निर्माण होत असल्याची माहिती समोर आली आहे.
बोरदैवत लघुपाटबंधारे प्रकल्पातून दि. २४ व २५ जानेवारी रोजी रब्बी पिकासाठी पाणी सोडले होते; मात्र देवळी वणी व बोरदैवत येथील ग्रामस्थांनी जबरदस्तीने करून पाणी बंद केल्याने या प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील अंबिका ओझर या गावाला पाणी पोहोचलेच नाही.
अंबिका ओझरपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी पाटबंधारे विभागाने प्रयत्न केले; परंतु काही शेतकरी बांधवांनी अटकाव केल्याने पाणी पोहोच करण्यात पाटबंधारे विभाग अपयशी ठरला. अंबिका ओझर येथील आदिवासी शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिले आहेत. रब्बीचे गहू, हरभरा, कांदा व भाजीपाला पिके केली आहेत. या पिकांना शेवटचे पाणी द्यावयाचे आहे. विहिरींनी तळ गाठल्याने पिकांना पाणी देणे शक्य नाही. म्हणून अंबिका ओझर येथील शेतकºयांनी पाण्याचे आवर्तन मिळण्यासाठी पाणी वापर संस्थेमार्फत पैसेही भरले आहेत. या पिकांना तत्काळ पाण्याची गरज आहे. पाणी सोडण्याच्या मागणीसाठी कळवण येथील लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर रामदास खिल्लारी, सरपंच गीताबाई खिल्लारी, इंदिराबाई भोये, मन्साराम गांगुर्डे, विक्र म भोये, पांडुरंग भोये, कांतिलाल भोये, पंढरीनाथ भोये, वामन भोये, रमेश बढावे, साहेबराव भोये, एकनाथ भोये, बुधा मांडवी, भाऊसाहेब भोये, रामचंद्र भोये, काशीराम जोपळे, विक्र म भोये यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. बोरदैवत लघु पाटबंधारे प्रकल्पाची क्षमता ५८ दशलक्ष घनफूट असून, आजमितीस २३ दशलक्ष घनफूट शिल्लक साठा आहे. पाणी सोडणे व बंद करण्यात गेट नादुरु स्त असल्याने अडचणी येतात. दि. २५ जानेवारी रोजी पाणी सोडले होते; मात्र स्थानिक नागरिकांनी दांडगाई करून पाणी बंद केले.
- अभिजित रौंदळ
सहायक अभियंता, कळवण

Web Title: Adivasi agitation fasting for the revolt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.