आदिवासी मराठी साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:26 AM2017-08-12T00:26:27+5:302017-08-12T00:26:32+5:30

आदर्श युवा मंडळ करंजूल व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात संपन्न आदिवासी साहित्य संमेलन संपन्न झाले. उपस्थित कवींनी यावेळी आदिवासींच्या व्यथा मांडल्या. अध्यक्षस्थानी कवी तुकाराम धांडे होते.

 Adivasi Marathi Sahitya Sammelan | आदिवासी मराठी साहित्य संमेलन

आदिवासी मराठी साहित्य संमेलन

googlenewsNext

सुरगाणा : आदर्श युवा मंडळ करंजूल व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात संपन्न आदिवासी साहित्य संमेलन संपन्न झाले. उपस्थित कवींनी यावेळी आदिवासींच्या व्यथा मांडल्या. अध्यक्षस्थानी कवी तुकाराम धांडे होते. व्यासपीठावर वसंत राठोड, पुंजाजी मालुंजकर, बनकर, शशिकांत सावंत, चंद्रकांत दिघावकर, सचिन अहेर, पूर्णा मिठारी, गोवर्धन, रतन चौधरी, रूपचंद डगळे आदी उपस्थित होते. संमेलनात कथाकथन, आदिवासी लोककला, खुले कविसंमेलन, आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. डोंगर माउली उत्सवाचे सादरीकरण करण्यात आले. रतन चौधरी यांना आदिवासींच्या जीवनावरील लेखनाबद्दल आदिवासी साहित्य पुरस्काराचे प्रदान करण्यात आले. आदिवासींच्या व्यथा, अज्ञान, अंधश्रद्धा निर्मूलन, सावकारी या विषयावर मनोगत व्यक्त केले. भाऊसाहेब नेहरे यांनी आदिवासींचा गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि परंपरा याविषयी व्याख्यान दिले. स्वतंत्र उठावाचे आदिवासींचे आंदोलन हे कळवण, सुरगाणा, चणकापूर लढा, बागलाणमध्ये पेटले ते पेठमध्ये विझले असा इतिहास सांगितला.  संमेलनाचा समारोप आदिवासी नृत्याने करण्यात आला. संमेलनाचे आयोजन तुळशिराम गावित, विठ्ठल गावित, प्रेमराज पवार यांनी केले.

Web Title:  Adivasi Marathi Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.