आदिवासीशक्ती सेनेचे जानोरीत आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:16 AM2021-09-22T04:16:12+5:302021-09-22T04:16:12+5:30

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील आदिवासी बांधवांच्या समस्यांचे निराकरण व विविध मागण्यांसाठी आदिवासीशक्ती सेनेच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर ...

Adivasi Shakti Sena's death hunger strike | आदिवासीशक्ती सेनेचे जानोरीत आमरण उपोषण

आदिवासीशक्ती सेनेचे जानोरीत आमरण उपोषण

Next

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील आदिवासी बांधवांच्या समस्यांचे निराकरण व विविध मागण्यांसाठी आदिवासीशक्ती सेनेच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.

दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील भूमापन क्रमांक ११२४ मध्ये दोन भाग असून भाग क्रमांक २ हा सरकार या नावाने भूमापन क्रमांक ११२४/२ क्षेत्र ०.८२ आहे . त्याचा उपभोग गावठाण विस्ताराकडे आहे. त्यात एकूण ३५ प्लॉटधारक प्रत्येकी १५० चौरस मीटर क्षेत्र व दोन लाभार्थ्यांना प्रत्येकी ३०० चौरस मीटर क्षेत्रात असे एकूण ३७ लाभार्थी असून, त्यांचे एकूण क्षेत्र ५८५० चौरस मीटर इतके आहे. या लाभार्थ्यांमध्ये जवळपास ९० टक्के लाभार्थी भूमिहीन आदिवासी समाजबांधव आहेत. सदर लाभार्थ्यांना तयार केलेल्या मंजूर अभिन्यासाप्रमाणे प्रत्येक प्लॉटच्या हद्दी खुणा ठरवून प्लॉटचे वाटप करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी, नाशिक यांनी १२ ऑक्टोबर १९८८ रोजी दिला आहे. सदर आदेशाची आजमितीस गट नंबर११२४/२च्या ७/११ उताऱ्यावर गावठाण विस्तार योजना प्लॉट पाडले आहेत, असा स्पष्ट उल्लेख आहे. प्लॉटधारकांनी अनेकवेळा प्रशासनास निवेदने व अर्ज दिले आहेत तरीदेखील प्रशासनाने आदिवासी बांधवांची कोणतीही दखल घेतली नाही. परिणामी जवळपास तीस वर्षांपासून लाभार्थी हक्काच्या जागेपासून वंचित आहेत. न्याय मागूनही न्याय मिळत नसल्याने आदिवासीशक्ती सेनेच्या वतीने उपोषणाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांनी उपोषणकर्त्यांना समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु अद्याप कोणताही मार्ग न निघाल्याने उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असून, आदिवासी बांधवांना न्याय द्यावा, अशी मागणी उपोषणकर्ते दत्तात्रय कोरडे, सोमनाथ वतार, रवींद्र बदादे, देवराम मोकाशी, ज्ञानेश्वर केंग, शंकर बेंडकुळे, गोरख जाधव, चंद्रकांत कडाळे, माधव मोरे, अंबादास फसाळे आदींनी केली आहे.

फोटो- २० आदिवासी सेना

जानोरी येथे उपोषणकर्त्यांशी चर्चा करताना गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, प्रशासक अण्णा गोपाळ, ग्रामसेवक के. के. पवार, तलाठी किरण भोये आदी.

200921\375120nsk_52_20092021_13.jpg

फोटो- २० आदिवासी सेना 

Web Title: Adivasi Shakti Sena's death hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.