आदिवासी झाले हायटेक; तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाढल्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:21 AM2018-04-25T00:21:35+5:302018-04-25T00:21:35+5:30
ग्रामीण पोलीस मुख्यालयात सुरू करण्यात आलेल्या सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून दहा महिन्यांत २१९ पेक्षा अधिक तक्रारी सोशल मीडियावरून प्राप्त झाल्या असून, १७१ तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे.
आडगाव : ग्रामीण पोलीस मुख्यालयात सुरू करण्यात आलेल्या सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून दहा महिन्यांत २१९ पेक्षा अधिक तक्रारी सोशल मीडियावरून प्राप्त झाल्या असून, १७१ तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे. पेठ, सुरगाणा, कळवण या आदिवासी भागांतून जास्तीत जास्त तक्रारी करण्यासाठी नागरिक सरसावत असल्याची माहिती प्राप्त झाली असून, ग्रामीण पोलिसांच्या सोशल मीडिया सेलकडे आदिवासी भागातून अधिकाधिक तक्रारी प्राप्त होत असून, कारवाई सुरू आहे. देशांत इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर हा अत्यंत प्रभावीपणे सुरू असून, केंद्र आणि राज्य सरकारनेदेखील डिजिटल इंडियाचा नारा देत सर्व सरकारी कार्यालयांचा कारभार डिजिटल करण्यावर भर दिला आहे. ग्रामीण भागातदेखील सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचमुळे ग्रामीण पोलीस मुख्यालयात नवनियुक्त पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी ग्रामीण पोलीस मुख्यालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांत म्हणजेच ७ जुलै २०१७ रोजी सोशल मीडिया सेल सुरू केले. त्यामुळे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात घडणाºया गुन्हेगारी घटनांच्या तक्र री नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहे. यामध्ये अवैध धंधे, अवैध दारू विक्री, घरगुती व शेजायांचे वाद, फोनवर येणारे फेक कॉल्स आणि विशेष म्हणजे स्थानिक पोलीस स्टेशनला तक् ार देऊनही कारवाई होत नसल्याबाबतच्या तक्रारी करण्यासदेखील नागरिक या माध्यमातून पुढे सरसावत आहे.
तक्र रींवरील कारवाईसाठी विशेष पथक
सोशल मीडिया सेलकडे येणाºया तक्रारींच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांकडून कोणतीही दखल न घेतल्या जाणाºया तक्र ारी सोशल मीडियावरून केल्या जात आहे. सोशल मीडियावर प्राप्त होणाºया तक्र ारींवर कारवाईसाठी विशेष पथकाची नेमणूक करून कारवाई होत आहे. पण यावरून स्थानिक पोलिसांच्या गलथान कारभाराचीदेखील यानिमित्ताने जाणीव होत असल्याने पोलीस कर्मचाºयांच्या तक्र ारीदेखील थेट अधीक्षकांपर्यंत करण्याचे व्यासपीठ सोशल मीडियामुळे प्राप्त झाले आहे.
१७१ तक्रारींवर कारवाई
जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण या अतिदुर्गम आदिवासी भागासह मालेगाव, सिन्नर, नांदगाव या भागांतील नागरिक तक्र ारी करण्यास पुढाकार घेत आहे. आदिवासी भागातील पेठ, सुरगाणा, कळवण या भागातून अधिकाधिक तक्र ारी प्राप्त होत असल्यामुळे सोशल मीडियाचे आदिवासी भागातील महत्त्व खºया अर्थाने अधोरेखित होत आहे. सोशल मीडियावर प्राप्त होणाºया तक्र ारींवर स्वत: पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांचे लक्ष असते. सोशल मीडिया सेल कार्यान्वित होऊन जवळपास दहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला असून २१९ पेक्षा अधिक तक्र ारी सोशल मीडियावरून प्राप्त झाल्या असून, १७१ तक्रारींवर कारवाई केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.