प्रशासनासमोर नगरसेवक हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:59 AM2018-03-29T00:59:22+5:302018-03-29T00:59:22+5:30

निवडणूक काळात मतदारांना आपलेसे करण्यासाठी प्रभागाचा कायापालट करण्याबरोबरच अनेक आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींना मात्र नगरसेवक झाल्यावर प्रभागातील विकासकामे तर सोडाच परंतु साध्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी अधिकाºयांकडे वारंवार तगादे लावावे लागत आहे. नगरसेवकांची जर अशी परिस्थिती असेल तर सामान्य नागरिकांचे प्रश्न कसे मार्गी लागणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Before the administration, corporator Hatab | प्रशासनासमोर नगरसेवक हतबल

प्रशासनासमोर नगरसेवक हतबल

Next

सिडको : निवडणूक काळात मतदारांना आपलेसे करण्यासाठी प्रभागाचा कायापालट करण्याबरोबरच अनेक आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींना मात्र नगरसेवक झाल्यावर प्रभागातील विकासकामे तर सोडाच परंतु साध्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी अधिकाºयांकडे वारंवार तगादे लावावे लागत आहे. नगरसेवकांची जर अशी परिस्थिती असेल तर सामान्य नागरिकांचे प्रश्न कसे मार्गी लागणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सिडको प्रभागसभा प्रभाग सभापती सुदाम डेमसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी नगरसेवकांनी प्रत्येक सभेप्रमाणे अधिकारी काम करीत नसल्याने नाराजी व्यक्त केली. नगरसेवक सुवर्णा मटाले यांनी प्रभागातील पाणीप्रश्न गंभीर झाला असल्याचे सांगत उद्यानातील पाला-पाचोळा साफ केला जात नसून कामकाजाबाबत अधिकाºयांकडे पाठपुरावा करूनही कामे मार्गी लागत नसल्याचेही मटाले यांनी सांगितले. नगरेसवक श्यामकुमार साबळे यांनी प्रभागातील अनेक दिवे चालू-बंद असतात, तसेच उद्यानांची दयनीय अवस्था झाली आहे. प्रभागात काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचेही नगरसेवक साबळे यांनी सांगितले. अधिकारी कामकाज करताना दुजाभाव करीत असून, प्रभाग २९ चा पाणीप्रश्न अत्यंत गंभीर बनला आह. प्रभागातील शिवपुरी चौक, राजरत्ननगर या भागात तर पिण्यापुरतेही पाणी नागरिकांना मिळत नसून अधिकाºयांनी हा प्रश्न त्वरित मार्गी न लावल्यास मनपा कार्यालयावर हंडा मार्चा काढणार असल्याचेही नगरसेवक राणे यांनी सांगितले. या चर्चेत नगरसेवक मुकेश शहाणे यांनीदेखील भाग घेत पाणी येत नसल्याने नागरिक हे सकाळी घरी येऊन आम्हाला जाब विचारता. अधिकारी हे कामकाज करताना दुजाभाव करीत असल्याचेही नगरसेवक शहाणे यांनी सांगितले. नगरेसवक डी. जी. सूर्यवंशी यांनी सांगितले की प्रभागात सुरळीत कामे केली जात नसून फक्त आयुक्त कडक असल्याचा कांगावा केला जात आहे, प्रत्यक्षात कर्मचारी व अधिकारी कोणालाही भीत नसून वरवर काम करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. प्रभागातील पाणीप्रश्न गंभीर बनला असून, उन्हाळा नुकताच सुरू झाला असताना अशी परिस्थिती असेत तर यापुढील काळात पाण्याचा प्रश्न अधिक कठीण होउ शकतो, असेही नगरसेवक सूर्यवंशी यांनी सांगितले.
नगरसेवक कल्पना पांडे यांनी सांगितले की प्रभागात नियमित साफसफाई होत नसून रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हाइडरमध्ये मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला असून, त्याची त्वरित साफसफाई करावी. याबरोबरच प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या जुने सिडको येथील मनपा रुग्णालयाची दुरुस्ती करणे गरजेचे असून, यासाठी याकामाला प्राधान्य देऊन अर्थसंकल्पात याचा समावेश करावा, असे नगरसेवक पांडे यांनी सांगितले. याप्रसंगी नगरसेवक हर्षा बडगुजर, कल्पना चुंभळे, छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे, संगीता जाधव, कावेरी घुगे, किरण गामणे, राकेश दोंदे, दीपक दातीर, भगवान दोंदे, विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत, बांधकाम विभागाचे ए. जे. काजीव, सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे कामांना ब्रेक
मनपा आयुक्तांच्या कामाची पद्धत व आदेशानुसार अर्थसंकल्पात ज्या कामांचा समावेश करण्यात आला आहे अशीच कामे येत्या वर्षभरात पूर्ण केली जाणार. या अर्थसंकल्पात काही अतिमहत्त्वाची कामे राहून गेली असेल तर त्या विकासकामांचा तांत्रिक अहवाल तपासून त्याचा प्रस्ताव त्वरित सादर करण्याबाबत आयुक्तांनी अधिकाºयांना आदेशित केले होते. परंतु असे असतानाही अधिकाºयांनी नागरी हिताच्या कामाचा एकही प्रस्ताव सादर केला नसल्याने याचा फटका नगरसेवकांना होणार आहे. यामुळे येत्या वर्षभरात महत्त्वाची नागरी कामे ही केवळ अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळेच मार्गी लागणार नाही. या कामात प्रामुख्याने रस्त्याला अडथळा ठरणारे मुख्य रस्ते डांबरीकरण करणे तसेच आरोग्य, मलनिस्सारण, उद्यानासह शहर सौंदर्याच्या कामांना आयुक्तांनी प्राधान्य दिले आहे. - सुधाकर बडगुजर, नगरसेवक, प्रभाग २५
नगरसेवकांनी घेतला काढता पाय
भाजपा नगरसेवकांची पक्षाची बैठक असल्याने नगरसेवकांनी प्रभाग सभेतून घाईघाइने बाहेर जाणे पसंत केले. प्रभाग सभेत अधिकारी नागरी कामे करीत नसेल तर याबाबत प्रश्न उपस्थित करणे गरजेचे असताना नगरसेवकांनी घाईघाइने प्रभागातून काढता पाय घेतला. यावरून सत्ताधारी नगरसेवकांना नागरिकांच्या कामाबाबत किती तत्परता आहे हे दिसून आले.

Web Title: Before the administration, corporator Hatab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.