राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी प्रशासनाची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 01:19 AM2018-10-12T01:19:17+5:302018-10-12T01:19:58+5:30
येत्या २२ तारखेला राष्टÑपती रामनाथ कोविंद हे मांगीतुंगीला भेट देणार आहेत. राष्टÑपतींच्या या दौºयाची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेण्यात आली. दरम्यान, राष्ट्रपतींच्या कार्यक्र मासाठीच्या मंडपाचे भूमिपूजन पीठाधीश रवींद्रकीर्ती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रज्ञाश्रमणी आर्यिका चंदनामती माताजी उपस्थित होत्या.
नाशिक : येत्या २२ तारखेला राष्टÑपती रामनाथ कोविंद हे मांगीतुंगीला भेट देणार आहेत. राष्टÑपतींच्या या दौºयाची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेण्यात आली. तसेच अधिकाºयांच्या एका तुकडीने हेलिपॅडच्या जागेची पाहणी केली. दरम्यान, राष्ट्रपतींच्या कार्यक्र मासाठीच्या मंडपाचे भूमिपूजन पीठाधीश रवींद्रकीर्ती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रज्ञाश्रमणी आर्यिका चंदनामती माताजी उपस्थित होत्या.
दिगंबर जैनांचे तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या २२ आॅक्टोबर रोजी येणार आहेत. साध्वी प.पू. ज्ञानमती माताजी आयोजित विश्वशांती अहिंसा महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.
राष्टÑपतींच्या दौºयासंदर्भात नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यात जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, पोलीस अधीक्षक संजय दराडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण, टेलिफोन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच रवींद्रकीर्ती स्वामी, अनिल जैन, संजय पापडीवाल, चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, विजय जैन उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपतींच्या स्वागतासाठीची आवश्यक माहिती तसेच सुरक्षेसंबंधी सर्व माहिती देण्यात आली.
या बैठकीनंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलोत्पर, सार्वजनिक बांधकाम व विद्युत विभागाचे अधिकारी यांनी मांगीतुंगी येथे जाऊन कार्यक्र मस्थळाची
तसेच हेलिपॅडच्या जागेचीही पाहणी केली. तसेच त्यासंदर्भात आयोजन समिती व संबंधित विभागांना सूचना दिल्या. शुक्रवारी (दि. १२) मांगीतुंगी येथे जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षेखाली सर्व विभागांच्या अधिकाºयांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मान्यवरांना निमंत्रण
या कार्यक्र मासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांनाही आयोजन समितीतर्फेमुंबई येथे जाऊन निमंत्रण देण्यात आले. त्यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, पीठाधीश रवींद्रकीर्ती, अनिल जैन, संजय पापडीवाल, भूषण कासलीवाल, कमल कासलीवाल, मांगीतुंगी प्राचीन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुमेर काले आदी उपस्थित होते.