प्रशासनाचे आदेश झुगारले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 11:12 PM2020-04-19T23:12:57+5:302020-04-19T23:13:12+5:30

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी असल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. या संकट काळाचा काही किराणा दुकानदारांनी फायदा घेत चढ्या दराने किराणा मालाची विक्री सुरूच ठेवली आहे.

Administration orders bowed! | प्रशासनाचे आदेश झुगारले !

प्रशासनाचे आदेश झुगारले !

Next
ठळक मुद्देलॉकडाउनचा फटका : किराणा दुकानदारांकडून लूटमार सुरूच

पिंपळगाव बसवंत : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी असल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. या संकट काळाचा काही किराणा दुकानदारांनी फायदा घेत चढ्या दराने
किराणा मालाची विक्री सुरूच ठेवली आहे.
प्रशासनाकडून किराणा दुकानदारांना जीवनावश्यक वस्तूंचे भावफलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच चढ्या दराने वस्तूची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे बजावण्यात आले असतानाही या आदेशाला पायदळी तुडवत किराणा दुकानदारांकडून लूटमार सुरूच असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
पिंपळगाव बसवंत व परिसरातील किराणा दुकानदार चढ्या दराने जीवनावश्यक वस्तूची विक्री करत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्याने तातडीने तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी गावातील किराणा दुकानदारांना बोलावून दुकानात जीवनावश्यक वस्तंूचे भावफलक लावण्याच्या सूचना देत किराणामाल चढ्या दराने विकाल तर कारवाई केली जाईल अशी
तंबी दिली होती. परंतु या आदेशाला किराणा दुकानदारांनी गांभीर्याने न घेता जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दरात विक्री करत ग्राहकांची लुटमार सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

बंद काळात बंदीची संधी घेत किराणा दुकानदार सर्वसामान्यांची लूट करत आहेत. त्यामुळे किराणा दुकानदारांना बोलावून चढ्या दराने किराणा माल विक्र ी करू नका व भावफलक लावा असे आदेश दिले. परंतु दुकानदार या आदेशाचे पालन करता की नाही याची दखल प्रशासनाने न घेतल्याने किराणा दुकानदारांनी अजूनही लूटमार थांबवलेली नाही. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन या लूटमार करणाºया दुकानांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
- त्रस्त ग्राहक

किराणा दुकानदारांना अभय कुणाचे ?
चढ्या दराने किराणा मालाची विक्र ी कराल तर कारवाई केली जाईल असे आदेश देऊनही दुकानदार सर्रास लूटमार करत आहेत तसेच भावफलकही लावलेला नाही. यावरून कोरानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन किती सतर्कआहे हे लक्षात येते. या संकट काळात लूटमार करणाºया किराणा दुकानदारांच्या पाठीशी कोणाचा हात आहे, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Administration orders bowed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.