गिरणा नदीपात्रातून वाळूचोरी रोखण्यासाठी प्रशासन सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:11 AM2021-06-18T04:11:08+5:302021-06-18T04:11:08+5:30
लोहोणेर : गिरणा नदीपात्रातून होणारी वाळूचोरी रोखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले असून, प्रांताधिकाऱ्यानंतर आज तहसीलदार शेजूळ व पोलीस निरीक्षक ...
लोहोणेर : गिरणा नदीपात्रातून होणारी वाळूचोरी रोखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले असून, प्रांताधिकाऱ्यानंतर आज तहसीलदार शेजूळ व पोलीस निरीक्षक देशमुख यांनी नदीकाठी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व ग्रामस्थांची भेट घेऊन एकमेकांच्या सहकार्याने वाळूचोरी थांबविण्यासाठी प्रयत्न करू व प्रसंगी गुन्हे दाखल करू, अशी माहिती तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांनी दिली. गिरणा नदीपात्रातून रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणावर वाळूतस्करी होत असल्याने याबाबत सतत आवाज उठवला जात आहे. याबाबत चांदवड- देवळा तालुक्याच्या प्रांताधिकाऱ्यांनी गिरणा नदीपात्रात जाऊन तेथे पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली असता नदीपात्रात जाणारे रस्ते बंद करण्याचा आदेश महसूल यंत्रणेला दिला होता. त्यानुसार नदीपात्रात जाणाऱ्या रस्त्यावर आडव्या चाऱ्या खोदून सदर रस्ते बंद करण्यात आले होते. मात्र, काल मध्यरात्रीच्या अंधारात वाळूतस्करांनी लोहोणेर गावानजीक हनुमान मंदिरालगत असलेल्या चारी बुजून रस्ता सुरू केल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. याची दखल घेऊन देवळा तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ, देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सभागृहात ग्रामस्थांची बैठक पार पडली. लोहोणेर मंडळ अधिकारी राम परदेशी यांनी महसूल विभागाच्या वतीने यापूर्वी खोदलेल्या चाऱ्या पुन्हा बुजविल्याने देवळा पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला असून, याबाबत देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे. बैठकीस मंडळ अधिकारी राम परदेशी, लिपिक आहिरे, नीलेश सावकार, ग्रामविकास अधिकारी यू.बी. खैरनार, योगेश पवार, रमेश आहिरे, सतीश देशमुख, प्रसाद देशमुख, राकेश गुळेचा, पोलीस पाटील अरुण उशिरे, अशोक महाजन, गणेश शेवाळे, धोंडू आहिरे, संजय सोनवणे, वसंत शेवाळे, मुकुंद मेतकर, दीपक देशमुख, समाधान महाजन आदींची उपस्थिती होती.
-------------------
खोदलेल्या चाऱ्या पुन्हा बुजविल्याने सदर चारी पुन्हा उकरताना उपस्थित अधिकारी व ग्रामस्थ.
(१७ लाेहोणेर १)
===Photopath===
170621\17nsk_48_17062021_13.jpg
===Caption===
१७ लोहोणेर १