पालक सचिवांच्या दौऱ्यामुळे प्रशासनाची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 01:15 AM2019-05-16T01:15:26+5:302019-05-16T01:16:11+5:30
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व त्यावर मात करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालक सचिव सीताराम कुंटे गुरुवारी नाशिक जिल्हा दौºयावर येत असून, त्यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची धावपळ वाढली आहे.
नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व त्यावर मात करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालक सचिव सीताराम कुंटे गुरुवारी नाशिक जिल्हा दौºयावर येत असून, त्यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची धावपळ वाढली आहे. कुंटे आपल्या दोनदिवसीय दौºयात जिल्ह्यातील महसूल अधिकाºयांचीही बैठक घेऊन आढावा घेणार आहेत.
या दौºयाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व अधिकाºयांना अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या असून, सर्व माहिती अपडेट ठेवण्याबरोबरच टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅँकर पोहोचविणे, त्याच्या फेºया तपासणे, छावण्यातील जनावरांची संख्या व त्यांना पुरविण्यात येणाºया सुविधांबाबत कोणतीही कसूर ठेवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कुंटे यांच्या दौºयाबाबत गोपनीयता पाळली जात असली तरी, सिन्नर तालुक्यात सुरू झालेल्या पहिल्याच चारा छावणीची ते पाहणी करतील.
त्याचबरोबर सिन्नर, मालेगाव, नांदगाव, येवला व बागलाण या पाच तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती सारखीच असल्याने यापैकी एखाद्या तालुक्याला ते भेट देण्याची शक्यता गृहीत धरून त्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्ह्णात आजमितीला टंचाईचा मुकाबला करण्यासाठी अन्य उपाययोजनांऐवजी फक्त टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यालाच प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मे महिन्याच्या दुसºया सप्ताहातच जिल्ह्णातील टॅँकरची संख्या २९१ पर्यंत पोहोचली असून, लवकरच ही संख्या तीनशेचा आकडा पार करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्ह्णातील धरणांमध्ये अवघा १३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. हवामान खात्याने यंदा मान्सूनचे आगमन उशिराने तसेच समाधानकारक नसल्याचे जाहीर केल्यामुळे पावसाळा लांबणीवर पडल्यास उपलब्ध पाणी साठा जुलै अखेरपर्यंत पुरविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे टँकर मंजुरीचे अधिकार प्रांतस्तरावर देण्यात आल्याने टँकरची संख्याही झपाट्याने वाढत असून, जिल्ह्णातील २४१ गावे, ८२२ वाड्या अशा १ हजार ६३ गावांना २९१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात २२ शासकीय आणि २६९ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात नांदगाव तालुक्यात सर्वाधिक ६१, सिन्नर तालुक्यात ५६ टँकर सुरू आहेत. टँकरच्या ७६७ फेºया मंजूर असून प्रत्यक्षात ७२२ फेºया सुरू आहेत.
विहीर अधिग्रहण
बागलाण २०, दिंडोरी ३, देवळा १८, इगतपुरी ४, कळवण ३५, मालेगाव ३८, नांदगाव १९, निफाड २, पेठ २६, सुरगाणा ४, सिन्नर ४, येवला ९.
जिल्ह्यातील पंधरापैकी बारा तालुक्यांत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, त्यात बागलाण ३८, चांदवड १३, दिंडोरी १, देवळा १३, इगतपुरी ४, मालेगाव ४७, नांदगाव ६१, सुरगाणा ६, पेठ २, सिन्नर ५६, त्र्यंबक ६, येवला ४४ टॅँकर सुरू आहेत. मे अखेरीस ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.