निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

By admin | Published: February 19, 2017 11:21 PM2017-02-19T23:21:36+5:302017-02-19T23:21:52+5:30

प्रचार थांबला : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी पोलीस यंत्रणेतर्फे जिल्ह्यात बंदोबस्त

The administrative machinery ready for the elections | निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

Next

नांदगाव : येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची प्रशासकीय तयारी झाली असून, एकूण १४७ मतदान केंद्रांमध्ये एक लाख ३१ हजार ७९२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी ९५९ कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाणे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत देवगुणे यांनी दिली.  एका मतदान केंद्रावर केंद्राध्यक्षासह पाच कर्मचारी व एक पोलीस अशी रचना आहे. संवेदनशील केंद्राची नोंद नसली तरी १७ गावांमध्ये ३४ केंद्रांवर अधिक लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. पुरु ष मतदार ६९,६०५ असून, स्त्री मतदार ६२,१८६ इतके आहेत. साकोरा, न्यायडोंगरी, भालूर व जातेगाव या चार गटांतून जिल्हा परिषेदेचे चार व साकोरा, वेहेळगाव, न्यायडोंगरी, सावरगाव, मांडवड, भालूर, पानेवाडी, जातेगाव या आठ गणांमधून पंचायत समितीसाठी आठ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. एकूण ९३ गावांमध्ये १४७ मतदान केंद्रे आहेत.  मतदानाची वेळ सकाळी ७.३० वाजेपासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे. मतमोजणी २३ तारखेला सकाळी १० वाजेपासून तहसील कार्यालयात सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण १२ टेबल असणार आहेत. पैकी गटासाठी चार व गणांसाठी आठ टेबल अशी व्यवस्था आहे. दुपारी १ वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील अशी अपेक्षा आहे, अशी माहिती सुलाणे यांनी दिली.
इगतपुरी तालुका
घोटी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुका निवडणूक प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज आहे. मतदान केंद्राध्यक्षांसह संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना यापूर्वीच विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. तालुक्यातील १६६ मतदान केंद्रांत ३३२ मतदानयंत्रे आदिंसह १० टक्के राखीव मतदानयंत्रांची संपूर्ण सेटिंग आणि सिलिंग पूर्ण झाले आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पुरे, निवासी नायब तहसीलदार संजय शिंदे हे डोळ्यांत तेल घालून काम करीत असल्याने प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे दिसत आहे. इगतपुरी तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या दहा गणांच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने १६६ मतदान केंद्रांवर गट आणि गणाचे प्रत्येकी एक असे ३३२ मतदानयंत्रे उमेदवारांची नावे आणि चिन्हांसह तयार केली आहेत. राखीव मतदानयंत्रेही सेटिंग करून तयार आहेत. इगतपुरी तालुक्यातील १८६ मतदान केंद्राध्यक्ष, ७४४ मतदान अधिकारी, १८६ शिपाई अशा एक हजार ११६ कर्मचाऱ्यांना मतदानप्रक्रियेचे प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आले आहे. सज्ज असलेली सीलबंद मतदानयंत्रे सोमवारी (दि. २०) मतदान केंद्रांवर पाठविली जातील.
एकंदरच प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिल पुरे, निवासी नायब तहसीलदार संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी तालुक्यातील निवडणूक यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज आहे. आचारसंहिता अंमलबजावणीवर संबंधित यंत्रणेचे विशेष लक्ष असून, सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांकडेही खास लक्ष ठेवून आहे. आचारसंहितेचे पालन केले जात आहे.
निफाड : निफाड तालुक्यातील १० जि. प आणि २० पं. स. गणासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी स्वाती थविल व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विनोद भामरे यांनी दिली. निफाड तालुक्यात ३,२८,५६२ मतदार असून १,७२,४६३ पुरुष मतदार १,५६,०९९ स्त्री मतदार आहेत.
या निवडणुकीसाठी ३३९ मतदान केंदे्र असून, निफाड विधानसभा मतदार संघात २४८ तर येवला मतदारसंघात ९१ मतदान केंदे्र आहेत. ३३९ मतदान केंद्रांसाठी २० क्षेत्रीय अधिकारी नियंत्रण ठेवतील प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक मतदान केंद्राध्यक्ष, चार मतदान अधिकारी व एक शिपाई असे सहा जणांचे पथक आहेत असे एकूण ३३९ पथके नेमण्यात आली असून ३५ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत.

 

Web Title: The administrative machinery ready for the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.