निवृत्तीनाथ यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 04:39 PM2019-01-25T16:39:30+5:302019-01-25T16:42:14+5:30

आढावा बैठक : यंदाही निर्मल वारीचा उपक्रम

The administrative machinery ready for the Nivrutinath Yatra | निवृत्तीनाथ यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

निवृत्तीनाथ यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

Next
ठळक मुद्देप्रांताधिकारी राहुल पाटील यांनी यावेळी यात्रेत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अभियान, निर्मल वारी, प्लॅस्टीक मुक्त अभियान राबविण्यासंदर्भात माहिती घेतली

त्र्यंबकेश्वर : येत्या ३० जानेवारी ते १ फेबु्वारी या कालावधीत येथे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा भरत असून या यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी बैठकीत दिली.
त्र्यंबकेश्वर तहसिलदार कार्यालयात आयोजित बैठकीत पाटील यांनी सर्व यंत्रणांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत तयारीचा आढावा घेतला. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, तहसिलदार महेन्द्र पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी उत्तम कडलग, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे आणि मुख्याधिकारी डॉ. चेतना केरु रे आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी यावेळी यात्रेत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अभियान, निर्मल वारी, प्लॅस्टीक मुक्त अभियान राबविण्यासंदर्भात माहिती घेतली. नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनीही सर्व यंत्रणांनी यात्रा सुस्थितीत व सुरळीत पार पाडण्याचे आवाहन केले. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्या निमित्ताने सर्व प्रशासनाची तयारी पुर्ण झाली असून दशमी, एकादशी व द्वादशी असा तीनही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस फौज फाटा तैनात केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पालिकेच्या विविध विभागासाठी यात्रा साहित्याची इ-निविदा द्वारे खरेदी होत आहे. पाणी पुरवठा,आरोग्य, पथदीप, रस्त्याची डागडुजी, कुशावर्त नियोजन आदी व्यवस्था करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले. तत्पूर्वी, त्र्यंबक नगरपरिषदेची यात्रा नियोजन बैठक त्र्यंबक नगरपालिका सभागृहात नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावर्षी नगरपरिषदे तर्फे निर्मल वारी उपक्र म प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. यासाठी 20 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. भाविकांनीही स्वच्छ सर्वेक्षण 2019 कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी त्र्यंबक नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन लोहगावकर यांनी केले. 
वारकऱ्यांच्या दिंड्या त्र्यंबकच्या दिशेने
संत निवृत्तीनाथ संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी आसुसलेल्या वारक-यांच्या दिंड्या आता त्र्यंबकेश्वरच्या दिशेने झेपावू लागल्या आहेत. साधारणपणे रविवारपासून पायी दिंड्या येण्यास सुरु वात होईल. तर येत्या यात्रेसाठी ३०० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी असलेले द्वार आता मोठे करण्यात आले आहे. मंदिराचे जीर्णोध्दाराचेकाम यात्रेपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Web Title: The administrative machinery ready for the Nivrutinath Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक