५१ ग्रामपालिकेवर प्रशासक नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 05:20 PM2021-07-17T17:20:27+5:302021-07-17T17:20:51+5:30

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात यावर्षी ५७ ग्रामपंचायतीच्या मुदती संपुष्टात येणार आहेत. कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. त्यात तिस-या संभाव्य लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे निवडणुकांबाबत अनिश्चितता असल्याने तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ५७ पैकी ५१ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. उर्वरीत सहा ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर २०२१ मध्ये संपणार असल्याने त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केले नाहीत.

Administrator appointed in 51 villages | ५१ ग्रामपालिकेवर प्रशासक नियुक्त

५१ ग्रामपालिकेवर प्रशासक नियुक्त

Next
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर तालुका : मुदत संपल्याने जि.प.ची कार्यवाही

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात यावर्षी ५७ ग्रामपंचायतीच्या मुदती संपुष्टात येणार आहेत. कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. त्यात तिस-या संभाव्य लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे निवडणुकांबाबत अनिश्चितता असल्याने तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ५७ पैकी ५१ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. उर्वरीत सहा ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर २०२१ मध्ये संपणार असल्याने त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केले नाहीत.

तालुक्यात ८४ ग्रामपंचायती असुन जानेवारी-फेब्रुवारी मध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्या, त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. आता ५७ ग्रामपंचायती शिल्लक असून दि. १३ ते २१ जुलै दरम्यान ५१ ग्रामपंचायतींच्या मुदती संपणार असल्याने या ग्रामपंचायतीं वर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी विविध खात्यांचे विस्तार अधिकारी यांची प्रशासक म्हणुन नियुक्ती केली आहे. त्यामध्ये, शिक्षण विस्तार अधिकारी मनोहर सुर्यवंशी - अस्वली हर्ष, सामुंडी, पेगलवाडी, त्र्यंबक व टाकेहर्ष, कृषीविस्तार अधिकारी प्रतिभा वसावे - ब्राम्हणवाडे, अंबई, अंबोली, कृषीविस्तार अधिकारी स्वाती भिसे - कोणे, गणेशगाव (वा), वेळे, झारवड खुर्द, धुमोडी, शिरसगाव त्र्यंबक, सहायक पशुधन विकास अधिकारी भगवंत गांगुर्डे-मुरंबी, देवळा (आ), गावठा, विस्तार अधिकारी सांख्यिकी संदीप चौधरी -
तोरंगण (ह), दलपतपुर व सापतपाली, शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र बोडके - ठाणापाडा, कोटंबी, कळमुस्ते, विस्तार अधिकारी एकात्मिक बालविकास प्रकल्प राजेंद्र शिलावट- वेळुंजे, नांदगाव, कोहळी, वरसविहीर, खरवळ, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी बाळु पवार - अंजनेरी, बेझे, पिंप्री त्र्यंबक, मुळेगाव, शिक्षण विस्तार अधिकारी राजेश्वर आहेर - चिंचवड, जातेगाव (बु), शिक्षण विस्तार अधिकारी मोठाभाउ चव्हाण - खैरायपाली, चिंचओहळ व देवडोंगरा, शिक्षण विस्तार अधिकारी गोविंद चव्हाण- पिंपळद, त्र्यंबक तळेगाव, त्र्यंबक काचुर्ली, कळमुस्ते त्र्यंबक, विस्तार अधिकारी शुभारंभ मनाई- रोहीले, हिरव, तळवाडे त्र्यंबक, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी दगडू राठोड- ओझरखेड, खडकओहळ, रायते, गडदवणे, शिरसगाव (ह), हातलोंढी तर कृषी अधिकारी सुनील विटनोर - मुलवड, भागओहळ, बेरवळ याप्रमाणे प्रशासकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

निवडणुका पुढील वर्षीच?
निवडणुक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी मतदार याद्या अद्ययावत करणे, प्रभाग रचना, मतदान केंद्रे निश्चित करणे आदी कामांसाठी किमान २-३ महिन्यांचा कालावधी लागेल. या कारणास्तव निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तिसरी लाट डिसेंबर किंवा जानेवारी पर्यंत राहील, असे सांगितले जात आहे. तोपर्यंत निवडणुकीची पुर्व तयारी करुन ठेवता येईल. त्यामुळे निवडणुका होण्यास नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Administrator appointed in 51 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.