कळवण नगरपंचायतीवर प्रशासक; विकास मीना यांची नियुक्ती; २०२१मध्ये होणार निवडणूक, मोर्चेबांधणीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:36 AM2020-12-04T04:36:29+5:302020-12-04T04:36:29+5:30
कळवण ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिली पंचवार्षिक निवडणूक १ नोव्हेंबर २०१५ मध्ये झाली होती. राष्ट्रवादीच्या पहिल्या नगराध्यक्ष सुनीता ...
कळवण ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिली पंचवार्षिक निवडणूक १ नोव्हेंबर २०१५ मध्ये झाली होती. राष्ट्रवादीच्या पहिल्या नगराध्यक्ष सुनीता पगार ह्या बिनविरोध झाल्यामुळे १६ जागांसाठी ७४ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. त्यात राष्ट्रवादी १६, काँग्रेस ११, भाजप ११, शिवसेना ३, मनसे ४, बसपा २ व अपक्ष २७ उमेदवार रिंगणात होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस ७, भाजप ४, काँग्रेस ३, शिवसेना १ व अपक्ष २ उमेदवार विजयी झाले होते.
राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व अपक्ष यांची मोट बांधून आमदार नितीन पवार व गटनेते कौतिक पगार यांनी २०१५ मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग कळवण शहरात करून नगरपंचायतीमध्ये सत्ता काबीज केली. गेल्या पाच वर्षात नगरपंचायतीला ३ नगराध्यक्ष, १० उपनगराध्यक्ष, ८ स्वीकृत नगरसेवक, ३ मुख्याधिकारी लाभले. येत्या जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारी महिन्यात पंचवार्षिक निवडणूक होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले आहे. आरक्षण व प्रभागरचनेवर हरकतीची मुदतही २६ नोव्हेंबर रोजी संपली असून, एक हरकत नोंदवली गेली आहे; मात्र ती फेटाळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. २०२१ मध्ये होणाऱ्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, सर्व १७ प्रभागात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे, माकपा या राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून, इच्छुकांनी प्रभाग शोधत प्रभागात तळ ठोकला आहे.