‘..तोपर्यंत प्रशासक हटणार नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:17 PM2018-10-15T23:17:25+5:302018-10-15T23:19:11+5:30

सातपूर : सर्वसाधारण सभेतील ठरावांचा इतिवृत्तांत आणि पत्र व्यवहार रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत रिझर्व्ह बँकेकडून काही निर्देश येत नाहीत तोपर्यंत प्रशासक हटणार नाही, अशी स्पष्टोक्ती नामको बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांनी दिली आहे.

'Administrator will not go away'. | ‘..तोपर्यंत प्रशासक हटणार नाही’

‘..तोपर्यंत प्रशासक हटणार नाही’

Next
ठळक मुद्देनामको प्रशासक भोरिया : आर्थिक वर्षाच्या अहवालाची दिली माहिती

सातपूर : सर्वसाधारण सभेतील ठरावांचा इतिवृत्तांत आणि पत्र व्यवहार रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत रिझर्व्ह बँकेकडून काही निर्देश येत नाहीत तोपर्यंत प्रशासक हटणार नाही, अशी स्पष्टोक्ती नामको बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांनी दिली आहे.
नामको बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आर्थिक वर्षाच्या अहवालाची माहिती देताना भोरिया यांनी प्रशासकीय काळातील बँकेचा चढता आलेख सादर करताना सांगितले की, संचालक मंडळाच्या कार्यकाळापेक्षा प्रशासकीय काळात म्हणजेच २०१३ नंतर आतापर्यंत सर्वाधिक नफा (३५ कोटी रु पयांपेक्षा अधिक नफा) बँकेला झालेला आहे. त्यामुळे सभासदांना १५ टक्के लाभांश आणि सेवकांना २० टक्के बोनस देण्याची तरतूद केली आहे. २०१३ साली अवघे ३६ कोटी रु पयांचे भागभांडवल आता ५० कोटी रु पयांवर पोहोचले आहे.
२०० कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षणासाठी दिल्लीला पाठविण्यात आलेले आहे. त्यामुळे बँकेच्या कामकाजात सुसूत्रता येत आहे. मात्र प्रशासकीय काळात अनेक कारणांमुळे १०.५९ टक्के एनपीए वाढला असला तरी त्यास प्रशासक जबाबदार नाही. एनपीए कमी करण्यासाठी त्या त्या शाखेला उद्दिष्टे देण्यात आलेले आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी सांगितले की, प्रशासक हटविणे माझ्या मतावर नाही. मात्र सर्वसाधारण सभेतील ठरावांचा इतिवृत्तांत आणि पत्रव्यवहार रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत रिझर्व्ह बँकेकडून काही निर्देश येत नाहीत तोपर्यंत प्रशासक हटणार नसल्याचे स्पष्ट केले.
प्रशासक हटविण्याबाबत शहरात बैठका होत असल्याची माहिती आपल्याकडे नसल्याचेही त्यांनी सांगितले.कायदेशीर कारवाई होणारचबँकेचे कर्ज थकविणाºया भुजबळांच्या आर्मस्ट्राँग कंपनीला जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. या मालमत्तेवर अजून कोणाचा बोजा आहे काय? याची खातरजमा करण्याचे काम सुरू आहे. लवकरच या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. थकबाकीदार कोणीही असो कायदेशीर कारवाई होणारच असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.नामको बँकेच्या सुरत आणि हैदराबाद शाखा सुस्थितीत नाहीत. त्या शाखा तोट्यात सुरू आहेत. परराज्यातील विशेषत: हैदराबाद शाखेत भाषेची मोठी अडचण निर्माण होत आहे. त्या शाखा बंद केल्यास मल्टिनॅशनल बँकेचा दर्जा रद्द होऊ शकतो.त्यामुळे परराज्यातील बँकेच्या शाखा बंद करता येत नसल्याचा खुलासा भोरिया यांनी केला आहे.

Web Title: 'Administrator will not go away'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक