११ फ्रेब्रुवारीपासून आरटीईसाठी प्रवेशप्रक्रिया, ११, १२ मार्चला लॉटरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 04:04 PM2020-01-31T16:04:57+5:302020-01-31T16:09:05+5:30
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवर पात्रताधारक पालकांना त्यांच्या पाल्यांच्या प्रवेशासाठी ११ ते २९ फेब्रुवारी या १५ दिवसांच्या कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर ११ व १२ मार्च असे दोन दिवस लॉटरी काढण्याची प्रक्रिया चालणार असून, या लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना १६ मार्च ते ३ एप्रिल या १५ दिवसांच्या कालावधीत गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी करून संधी मिळालेल्या शाळेत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
नाशिक : आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवर पात्रताधारक पालकांना त्यांच्या पाल्यांच्या प्रवेशासाठी ११ ते २९ फेब्रुवारी या १५ दिवसांच्या कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर ११ व १२ मार्च असे दोन दिवस लॉटरी काढण्याची प्रक्रिया चालणार असून, या लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना १६ मार्च ते ३ एप्रिल या १५ दिवसांच्या कालावधीत गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी करून संधी मिळालेल्या शाळेत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी यापूर्वी नोंदणी केलेल्या शाळांना स्वयंचलितरीत्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया दि.२१ जानेवारीपासून सुरू झाली असून, सोबतच गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून नवीन नोंदणी केलेल्या शाळांची पडताळणीही सुरू झाली आहे. ही पडताळणी प्रक्रिया ६ फेब्रुवारीर्यंत चालणार असून, त्यानंतर ११ ते २९ फेब्रुवारी या १५ दिवसांच्या कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर ११ व १२ मार्च असे दोन दिवस लॉटरी व १६ मार्च ते ३ एप्रिल या १५ दिवसांच्या कालावधीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी करून संधी मिळालेल्या शाळेत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. दरम्यान, लॉटरीतून संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर प्रतीक्षा यादीनुसार चार टप्प्यांमध्ये प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. यातील पहिला टप्पा १३ ते १८ एप्रिल असा पाच दिवसांचा, दुसरा टप्पा २४ ते २९ फेब्रुवारी, तिसरी यादी ६ ते १२ मे व चौथी यादी १८ ते २२ मे या कालावधीत राबविली जाणार असून, प्रत्येक टप्प्यात विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पाच दिवसांचा कालावधी मिळणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
एकच लॉटरी
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी राबविण्यात येणाºया प्रवेशप्रक्रियेत काही बदल करण्यात आले असून, यावर्षी आरटीई प्रवेशप्रक्रियेत केवळ एकच लॉटरी काढण्यात येणार आहे. या लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशासाठी संधी मिळालेल्या पालकांना दिलेल्या मुदतीत गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश निश्चित करणे अनिवार्य असून, निश्चित मुदतीनंतर उर्वरित विद्यार्थ्यांसाठी चार टप्प्यात प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.