अकरावीत सतराशे विद्यार्थ्यांचे प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 12:55 AM2018-07-07T00:55:57+5:302018-07-07T00:56:02+5:30
नाशिक : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, पहिल्या फेरीत झालेल्या ११ हजार ५२६ जागांपैकी १६७० विद्यार्थ्यांनी संधी मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केले असून, शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी शुक्रवारी (दि.६) मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले.

विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती विज्ञान शाखेला मिळाली असून, पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या ११ हजार ५२६ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत विज्ञान शाखेत प्रवेशाची संधी मिळालेल्या ५ हजार ९४ पैकी ८५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, वाणिज्य शाखेत ४ हजार १३३ पैकी ५२७, कला शाखेत २ हजार ८७ पैकी २५३ व एमसीव्हीसीमध्ये २१२ पैकी ३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे. तर एचपीटी महाविद्यालयात कला शाखेच्या एका विद्यार्थ्याला आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी प्रवेश नाकारण्यात आला. पहिल्या फेरीत ९ हजार ८५० विद्यार्थ्यांनी अद्यापही संधी मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी संपर्क केलेला नाही. यातील पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत संधी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांना अकरावीला प्रवेश मिळणार नसल्याचे शिक्षण विभागाने यापूर्वी स्पष्ट के ले आहे. त्यामुळे सोमवारी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आणखी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळण्याची शक्यता आहे.