आदिवासींच्या विकासासाठी भोयेगाव घेणार दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 11:26 PM2017-08-18T23:26:54+5:302017-08-19T00:14:59+5:30
आदिवासींच्या विकासासाठी आपण चांदवड तालुक्यातील भोयेगाव दत्तक घेणार असल्याचा निर्धार ख्वाडा चित्रपटातील नायक भाऊसाहेब शिंदे यांनी केला. भोयेगाव येथील अदिवासी तरुण रामदास व अशोक हरी बर्डे यांच्या आग्रहाखातर ख्वाडा चित्रपटाचे नायक भाऊसाहेब शिंदे भोेयेगावी आले होते. यावेळी त्यांचा गावकºयांनी सत्कार केला.
चांदवड : आदिवासींच्या विकासासाठी आपण चांदवड तालुक्यातील भोयेगाव दत्तक घेणार असल्याचा निर्धार ख्वाडा चित्रपटातील नायक भाऊसाहेब शिंदे यांनी केला. भोयेगाव येथील अदिवासी तरुण रामदास व अशोक हरी बर्डे यांच्या आग्रहाखातर ख्वाडा चित्रपटाचे नायक भाऊसाहेब शिंदे भोेयेगावी आले होते. यावेळी त्यांचा गावकºयांनी सत्कार केला.
इयत्ता पाचवी ते आठवीतील मुलींसाठी प्रत्येक भिल्ल वस्तीत प्रशिक्षण वर्ग देणे, या समाजाला जागरूक करून त्यांना त्यांचे रेशनचे धान्य कोणालाही विकू देऊ नये, रेशनकार्ड मिळविण्यासाठी प्रयत्न करणे, तरुणांना या गावातील २५ ते ३० टक्के आदिवासी व्यसनमुक्त झाला तरी काम चांगले उभे राहील, अशी अपेक्षा शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारोतीराव ठोंबरे, राजेंद्र मलोसे, डॉ. मेधा मलोसे यांनीही शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी कवी विष्णू थोरे, रवींद्र देवरे, सागर जाधव जोपूळकर, रावसाहेब जाधव, महेश गुजराथी, मारुतीराव ठोंबरे, भोयेगावचे रामदास बर्डे, अशोक बर्डे, सुकदेव ठोंबरे, कैलास सोनवणे आदि उपस्थित होते. यावेळी नायक भाऊसाहेब शिंदे यांनी अदिवासींच्या विकासाबाबतच्या दृष्टिकोनातून उपाययोजनांबाबत चर्चा केली. किशोरवयातच अदिवासी मुला-मुलींच्या प्रबोधन गरजेबाबतचे महत्त्व डॉ. मेधा मलोसे यांनी मत व्यक्त केले. ख्वाडा या चित्रपटातील अनुभव त्यांनी यावेळी कथन केले.
या चर्चेत नायक शिंदे यांनी आदिवासींचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी उत्सुक असलेल्या युवकांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला तर त्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आश्वासन दिले. ख्वाडा या चित्रपटातील अनुभव त्यांनी यावेळी कथन केले. दिवाळीदरम्यान आगामी बबन नावाचा चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.