..अन् तृतीयपंथीयांनी केली मनोभावे वडपूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 01:29 AM2018-06-28T01:29:54+5:302018-06-28T01:35:39+5:30

नाशिक : पूजेच्या साहित्याने सजलेले ताट, मध्यभागी वडाच्या झाडाची कुंडी, मंद तेवणारी समई, झेंडूच्या फुलांचा हार व तोरण, उदबत्तीचा दरवळ अशा मंगलमय वातावरणात उत्साहाला उधाण आले होते. तुम्ही म्हणाल वटपौर्णिमा असल्याने हे चित्र तर सर्वत्र दिसणे स्वाभाविकच आहे पण ही सारी सिद्धता कुठल्याही वडपुजेच्या ठिकाणी नव्हती तर तृतीयपंथियांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या कार्यालयात दिसून आली.

..adpooja to feel the third party | ..अन् तृतीयपंथीयांनी केली मनोभावे वडपूजा

..अन् तृतीयपंथीयांनी केली मनोभावे वडपूजा

googlenewsNext
ठळक मुद्देमनमीलन संस्थेचा उपक्रम तृतीयपंथीयांची संस्था असलेल्या ‘मनमीलन संस्थे’तर्फे वटपौर्णिमा साजरी

नाशिक : पूजेच्या साहित्याने सजलेले ताट, मध्यभागी वडाच्या झाडाची कुंडी, मंद तेवणारी समई, झेंडूच्या फुलांचा हार व तोरण, उदबत्तीचा दरवळ अशा मंगलमय वातावरणात उत्साहाला उधाण आले होते. तुम्ही म्हणाल वटपौर्णिमा असल्याने हे चित्र तर सर्वत्र दिसणे स्वाभाविकच आहे पण ही सारी सिद्धता कुठल्याही वडपुजेच्या ठिकाणी नव्हती तर तृतीयपंथियांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या कार्यालयात दिसून आली.
आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे, त्याचे आरोग्य चांगले राहावे यासाठी सुहासिनी वटपौर्णिमेला वडाची मनोभावे पूजा करतात. यानिमित्ताने नटूनथटून, दागदागिने, चांगल्या साड्या घालून निसर्गाच्या सान्निध्यात वेळ व्यतीत करतात, अशी संधी आपण का घेऊ नये हा विचार करून शहरातील तृतीयपंथीयांची संस्था असलेल्या ‘मनमीलन संस्थे’तर्फे वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. संस्थेच्या गंजमाळ येथील कार्यालयात वडाचे झाड आणून जवळपास ३० तृतीयपंथीय व काही समलैंगिक पुरुष यांनी एकत्र जमत वडाचे यथासांग पूजन केले. संस्थेतर्फे दरमहा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम घेतला जातो. त्यात यावर्षीपासून वटपौर्णिमा साजरी करण्याचा विचार मनात आल्याने व त्यावर बहुमत झाल्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यासाठी बाजारातून पूजेचे सर्व साहित्य आणण्यात आले होते.
वडाच्या झाडाला सर्व पूजा अर्पण करून मनोभावे दोरे बांधून, आरती करून पूजा करण्यात आली. रांगोळी, समई, हार, फुले, उदबत्ती, फळे अशी सारी सज्जता करण्यात आली होती. पूजेनंतर एक वेगळा आनंद लाभल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.केवळ समाधानासाठी
तृतीयपंथीय लोक आपल्यात एक स्त्री लपलेली असते असे मानतात. त्यामुळे इतर स्त्रियांप्रमाणे आपणही साजशृंगार करून पूजा करावी, धार्मिक कार्यक्रमाद्वारे हे आगळेवेगळे समाधान मिळवावे असा विचार त्यांच्या मनात आला. त्यानुसार हा कार्यक्रम पार पडला. पूजेनंतर सर्वांच्या चेहेºयावर एक वेगळेच समाधान दिसले.
- राजेंद्र गमे, प्रकल्प समन्वयक, मनमीलन संस्था

Web Title: ..adpooja to feel the third party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.