व्यसनांकडे आजार म्हणून पाहावे शिव छत्रपती पुरस्कार विजेत्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 01:16 AM2018-03-04T01:16:30+5:302018-03-04T01:16:30+5:30
सिडको : मुक्तांगण व्यसनमुक्तीच्या वतीने क्र ीडाक्षेत्रातील शिव छत्रपती पुरस्कार विजेत्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
सिडको : मुक्तांगण व्यसनमुक्तीच्या वतीने क्र ीडाक्षेत्रातील शिव छत्रपती पुरस्कार विजेत्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी व्यसनमुक्तीचे समुपदेशक माधव कोल्हटकर उपस्थित होते. नाशिक गंजमाळ येथील रोटरी क्लबच्या सभागृहात मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्र ीडाक्षेत्रातील छत्रपती पुरस्कार विजेते अविनाश खैरनार, अस्मिता दुधारे व समाजवादी चळवळीत काम करणारे अरु ण ठाकूर यांच्या व्यसनमुक्तीचे नितीन देऊस्कर व दत्ता श्रीखंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळू बोलताना माधव कोल्हटकर म्हणाले की, आजची पिढी ही अधिक व्यसनाधीन होत असून, यापुढे संपूर्ण कुटुंबच चिंताग्रस्त होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. व्यसनामुळे विस्कळीत झालेला दिनक्र म पुन्हा कसा सुधारेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. घरातील एखादी व्यक्ती जरी व्यसनाधीन असली तरी त्याचा त्रास सहन करावा लागतो. कुटुंबातील व्यक्ती व्यसनाधीन झाल्यावर इतर सदस्यांवर त्याचा ताण पडतो. व्यसनामुळे स्वभावदोषात वाढ तर होतेच परंतु त्याच्या व्यक्तिमत्त्वातही बदल होत असतो. व्यसनामुळे मेंदूच्या पेशींवर परिणाम होतो. मेंदूच्या पेशींवर मानवी स्वभाव, व्यक्तिमत्त्व ठरते. आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे की, व्यक्तिमत्त्वात असलेले दोषही व्यसनामुळे उठून दिसतात. अजूनही भारतीय समाज व्यसनाकडे आजार म्हणून पाहत नाही हे दुर्दैव आहे. आजची तरु ण पिढी व्यसनाकडे आदर्श किंवा स्टेट्स म्हणून पाहतो. परंतु व्यसनांमुळे आयुष्य हळूहळू कमी होत जाते याकडे लक्ष दिले जात नाही. व्यसनाधिनांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन याविषयी माहिती जाणून घेणे गरजेचे असल्याचेही कोल्हटकर यांनी सांगितले.