खामखेडा येथे उन्नत शेती-समृद्ध शेतकरी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 07:33 PM2019-06-04T19:33:49+5:302019-06-04T19:37:07+5:30
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथील मोरेवाडी शिवारातील हनुमान मंदिरात उन्नत शेती-समृद्ध शेतकरी उपक्र म कार्यशाळा घेण्यात आली. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला.
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथील मोरेवाडी शिवारातील हनुमान मंदिरात उन्नत शेती-समृद्ध शेतकरी उपक्र म कार्यशाळा घेण्यात आली. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला.
राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे खामखेडा येथे मोरेवाडी येथील हनुमान मंदिरात माजी सरपंच संतोष मोरे यांच्या अध्यक्षतेखाली उन्नत शेती-समृद्ध शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी कृषी सहायक गडाख यांनी शेतकऱ्यांना बाजारू किंवा बियाणे विकत घेण्यापेक्षा घरगुती बियाणावर बीज प्रक्रि या करून बियाणांची उगवण क्षमता कशी वाढवीत येईल यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच पीक विमा योजना, दुष्काळी परिस्थितीत फळबाग वाचविण्यासाठी उपाययोजना ठिबक सिंचन योजना, शेती अवजारे व त्यावरील सबसिडी आदी योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. तसेच मका पिकावरील लष्करी आळीचे कशा प्रकारे नियंत्रण करता येईल याविषयी शेतकºयांना मार्गदर्शन केले.
यावेळी उपसरपंच संतोष मोरे, रमेश शेवाळे, मुकुंद बोरसे, साहेबराव शेवाळे, दीपक मोरे, बाळू शेवाळे, दत्त मोरे, देविदास बोरसे आदी शेतकरी उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन विजय सूर्यवंशी यांनी तर आभार कृषी सहायक गडाख यांनी मानले.