चाळीस वर्षांतील जाहिरातींच्या इतिहासाचा उलगडला पट जाहिरात चालिसा : शाहु खैरे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद््घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:29 AM2018-05-27T01:29:31+5:302018-05-27T01:29:31+5:30
नाशिक : जाहिरात ही पासष्टावी कला मानले जाते, पण जाहिरात म्हणजे असते तरी काय, आकार, चित्र, मॉडेल, शब्द... म्हटले तर सारेच महत्त्वाचे आहेत.
नाशिक : जाहिरात ही पासष्टावी कला मानले जाते, पण जाहिरात म्हणजे असते तरी काय, आकार, चित्र, मॉडेल, शब्द... म्हटले तर सारेच महत्त्वाचे आहेत. परंतु काळ बदलत गेला तसे जाहिरातींचे स्वरूपही बदलत गेले. गेल्या चाळीस वर्षांतील या बदलत्या क्षेत्राचा वेध घेणाऱ्या आणि सुनील धोपावकर यांनी साकारलेल्या ‘जाहिरात चालिसा’ या प्रदर्शनाला शनिवारी (दि.२६) प्रारंभ झाला.
गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकात सुनील धोपावकर यांनी साकारलेल्या या प्रदर्शनाचे उद््घाटन ज्येष्ठ नगरसेवक शाहू खैरे यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले. यावेळी जाहिरात क्षेत्रांतील जाणकार नव्हे तर एक कलासक्त मित्र म्हणून धोपावकर यांनी कलाक्षेत्रात योगदान दिले आणि नाशिकमध्ये संस्कृतीच्या वतीने साकारलेल्या पाडवा पहाटपासून सावरकरांच्या शौर्य व्याख्यानमालेच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांचे असलेले योगदान अमूल्य असल्याच्या भावना यावेळी शाहू खैरे यांनी व्यक्त केल्या.
अभिनेत्री मृणाल दुसानीस यांनी नाशिकला मिळालेल्या जाहिरातील ब्रेकमुळे पुढील यशोशिखरावर पोहोचल्याचे नमूद करतानाच नाशिकमध्ये शिकलेली शिस्त, वक्तशीरपणा मुंबईत कामी आल्याचे नमूद केले. जाहिरात क्षेत्रात साथ देणाºया मृणाल दुसानीसबरोबरच रंगभूषाकार माणिक कानडे, ज्येष्ठ छायाचित्रकार शिरीष हिंगणे व संजय कवडे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सदरच्या प्रदर्शन हे २९ मेपर्यंत सकाळी व सायंकाळी खुले असून, चाळीस श्लोकात नमूद केलेला जाहिरातींचा महिमा ही पुस्तिका मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.