रामकुंडात अष्टोप्रहर शुद्ध पाण्यासाठीही सल्लागार ; कोट्यवधी रुपये मोजण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:08 AM2017-11-23T00:08:49+5:302017-11-23T00:11:05+5:30
महापालिकेत कुठलेही काम आता सल्लागारांच्या सल्ल्याशिवाय न करण्याचा विडा प्रशासनाने उचललेला आहे. आता तर प्रशासनाने चक्क गोदावरीतील रामकुंडात अष्टोप्रहर पाणी कसे शुद्ध राहील व यासाठी काय केले पाहिजे, हा सल्ला मिळविण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा घाट घातला आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी नेमण्यात आलेल्या सल्लागारांवर महापालिकेने कोट्यवधी रुपये मोजण्याची तयारी ठेवलेली आहे.
नाशिक : महापालिकेत कुठलेही काम आता सल्लागारांच्या सल्ल्याशिवाय न करण्याचा विडा प्रशासनाने उचललेला आहे. आता तर प्रशासनाने चक्क गोदावरीतील रामकुंडात अष्टोप्रहर पाणी कसे शुद्ध राहील व यासाठी काय केले पाहिजे, हा सल्ला मिळविण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा घाट घातला आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी नेमण्यात आलेल्या सल्लागारांवर महापालिकेने कोट्यवधी रुपये मोजण्याची तयारी ठेवलेली आहे. गोदावरी नदीवरील पवित्र मानल्या जाणाºया रामकुंडात शुद्ध व स्वच्छ पाणी राहावे याकरिता महापालिकेने यापूर्वी फिल्ट्रेशन प्लॅँटही बसविला होता. सदर प्रयोग फेल गेल्यानंतर महापालिकेने रामकुंडात पाणीपुरवठ्यासाठी थेट पाइपलाइन टाकली. सद्यस्थितीत रामकुंडातील अमृतकुंभातून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. रामकुंडात स्नानासाठी देश-विदेशातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. रामकुंडात कायमस्वरूपी शुद्ध आणि स्वच्छ पाणी राहावे यासाठी महापालिकेने आजवर प्रयत्न केले आहेत; परंतु भाविकांची वाढती संख्या आणि दैनंदिन होणारे विधी लक्षात घेता रामकुंडात निर्माल्यासह पाण्याच्या शुद्धतेला बाधा पोहोचत असते. रामकुंडात कायमस्वरूपी शुद्ध आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी महापालिका प्रशासनाने आता सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव ठेवला असून, त्यासंदर्भात निविदाही मागविण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात गोदावरीला दरवर्षी सरासरी किमान तीन ते चार पूर येतात. अशावेळी रामकुंडातील पाणीही दूषित होते. ज्यावेळी गंगापूर धरणातून सिंचनासाठी पाण्याची आवर्तने असतात त्यावेळी गोदावरी प्रवाहित असते. त्यामुळे उन्हाळा आणि हिवाळ्यात रामकुंडातील पाणी कसे शुद्ध राखता येईल यावर काम करण्यासाठी महापालिकेने थेट सल्लागारांकडूनच सल्ला मागविण्याचे ठरविले आहे. सदर सल्लागाराकडून त्यानुसार सविस्तर प्राकलन तयार करून घेतले जाणार असून, त्यासाठी लाखो रुपयांची फी मोजली जाणार आहे.
विचारपूर्वक कृतीची गरज
सल्लागारांकडून मिळणाºया सल्ल्यांचे आजवर महापालिकेने नेमके काय केले आहे, याबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. स्मार्ट सिटीचा प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेला कोट्यवधी रुपये मोजण्यात आले; परंतु सदर आराखडा किती फसवा आणि अव्यवहार्य आहे, याची प्रचिती खुद्द स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांना आलेली आहे. शहर वाहतूक आराखडाही तयार करण्यात आला; परंतु त्यातील सूचनाही व्यवहार्य नसल्याची चर्चा होत असते. त्यामुळे सल्लागार नेमताना विचारपूर्वक कृतीची गरज असल्याचा सूर सदस्यांमधून व्यक्त होताना दिसून येत आहे.