वाघ कृषी महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:11 AM2019-02-23T01:11:25+5:302019-02-23T01:11:41+5:30
कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी व कृषिसंलग्न महाविद्यालयात वार्षिक संमेलन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वि. मा. सेवलीकर, तर प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत नाईकवाडी उपस्थित होते.
नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी व कृषिसंलग्न महाविद्यालयात वार्षिक संमेलन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वि. मा. सेवलीकर, तर प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत नाईकवाडी उपस्थित होते.
वार्षिक संमेलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नाईकवाडी म्हणाले, नेदरलँड व इस्राइल या दोन देशांनी प्रतिकूल परिस्थिती असतानादेखील आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतीत प्रगती केली. त्यांच्यासारख्या कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या देशांच्या कृषी यांत्रिक तंत्रज्ञान भारतीय तरुणांनी आत्मसात करण्याची गरज व्यक्त केली. त्याचप्रमाणे पीक पद्धतीत तरुणांनी सेंद्रिय शेतीची कास धरून विषमुक्त शेतीकडे वळत पर्यावरण व मानवी आरोग्याचा समतोल राखले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रा. तुषार उगले, प्रा. नितीन देवशेटे, मोहिनी जगताप, डॉ. एन. एस. पाचपोर यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर तसेच मार्केटिंग व ब्रँडिंग याकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर नाटिका सादर करत बेटी बचाव, बेटी
पढाव, स्त्री हक्क, रस्ता सुरक्षा व वाढते अपघात, पानी बचत यावर प्रकाश टाकला.