ऑनलाइन लसीकरणामुळे सर्वसामान्यांची परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 10:53 PM2021-05-13T22:53:49+5:302021-05-14T01:01:07+5:30
देवगाव/घोटी : लसीच्या तुटवड्याचे नियोजन करण्यासाठी शासन आणि प्रशासनाने काढलेली ऑनलाइन अपॉइंटमेंटची पळवाट सर्वसामान्य जनता आणि आदिवासी बांधवांसाठी उपयुक्त ...
देवगाव/घोटी : लसीच्या तुटवड्याचे नियोजन करण्यासाठी शासन आणि प्रशासनाने काढलेली ऑनलाइन अपॉइंटमेंटची पळवाट सर्वसामान्य जनता आणि आदिवासी बांधवांसाठी उपयुक्त नाही. कोविड लसीकरणाच्या ऑनलाइन अपॉइंटमेंट प्रक्रियेपासून सर्वसामान्य जनता आणि आदिवासी बांधव कोसो मैल दूर आहेत.
एकीकडे कोरोना प्रादुर्भावाचा वाढता धोका आणि नियोजन्य शून्य लसीकरण मोहिमेमुळे नागरिकांना मोठी डोकेदुखी झाली आहे. लसीचा तुटवडा आणि त्यामुळे बंद पडलेली लसीकरण केंद्रे यामुळे कोरोनाला कसे हरविणार? हा प्रश्न जनसामान्यांच्या मनात कायम आहे. लसीच्या तुटवड्याचे नियोजन करण्यासाठी शासन आणि प्रशासनाने काढलेली ऑनलाइन अपॉइंटमेंटची पळवाट सर्वसामान्य जनता आणि आदिवासी बांधवांसाठी उपयुक्त नाही. कोविड लसीकरणाच्या ऑनलाइन अपॉइंटमेंट प्रक्रियेपासून सर्वसामान्य जनता आणि आदिवासी बांधव कोसो मैल दूर आहेत. मग, समाजातील अशा घटकांनी काय करावे, असा चिंतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे ग्रामीण भागात कोरोना वाढतो आहे. कधी १८ ते ४४ वयोगातील लसीकरण सुरू आहे, तर कधी ४५ वरील दुसरा डोस सुरू आहे. त्यामध्ये देखील कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या तुटवड्यामुळे हवा तो डोस उपलब्ध होताना दिसत नाही. अनेक केंद्रांवर कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसची गरज आहे. मात्र, तिथे कोव्हॅक्सिन उपलब्ध असल्याने नागरिकांना घेता येत नाही.
कोविड लसीच्या तुटवड्यामुळे होणारा पुरवठा तुटपुंज्या लसीच्या डोसमध्ये लसीकरण सुरू आहे. लसी कमी असल्याने ऑनलाइन अपॉइंटमेंट घेणाऱ्यांना मर्यादित लोकांना लस दिली जात आहे. मात्र, या एकूण प्रक्रियेत नसलेल्या सर्वसामान्य जनतेने, आदिवासी बांधवांनी काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोविड लसीकरण मोहीम सरसकट राबवून कोरोनाला हरविण्याचे, रोखण्याचे एकमेव सुरक्षा कवच नागरिकांना जलदगतीने द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.