अफगाणस्तिानचा कांदा भारतात दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 11:58 PM2019-10-18T23:58:33+5:302019-10-18T23:58:58+5:30

लासलगाव : अफगाणस्तिानमधुन आयात केलेला कांदा मुंबईत दाखल झाला असुन कांदा उत्पादकांना या बातमीने हैराण केले आहे. लालसर व थैडासा पर्पल रंगाचा हा मोठ्या आकाराचा कांदा आता कांदा भावावर काय परिणामकारक ठरतो हे दोन दिवसात समजेल.परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर दाखल झालेला हा कांदा आता राजकीयदृष्ट्या सत्ताधारी पक्षाला फायदेशीर होतो कि फटका देणार हे समजेल.

Afghan onion arrives in India | अफगाणस्तिानचा कांदा भारतात दाखल 

अफगाणस्तिानचा कांदा भारतात दाखल 

Next
ठळक मुद्दे21 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने कांदा व धान्य लिलाव बंद

लासलगाव : अफगाणस्तिानमधुन आयात केलेला कांदा मुंबईत दाखल झाला असुन कांदा उत्पादकांना या बातमीने हैराण केले आहे.
लालसर व थैडासा पर्पल रंगाचा हा मोठ्या आकाराचा कांदा आता कांदा भावावर काय परिणामकारक ठरतो हे दोन दिवसात समजेल.परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर दाखल झालेला हा कांदा आता राजकीयदृष्ट्या सत्ताधारी पक्षाला फायदेशीर होतो कि फटका देणार हे समजेल.
गुरु वारच्या तुलनेत आज शुक्र वारी कमाल भावात 120रूपयांची तर सरासरी व किमान भावात 100रूपयांची घसरण झाली.लासलगांव बाजार समतिीत आज शुक्र वारी दि.
दिनांक 18 आॅक्टोबर रोजी337 वाहनातील 3100 क्विंटल कांदा किमान 1100 ते कमाल 2801 ल सरासरी 2450 रूपये भावाने विक्र ी झाला.
दिनांक:-19 रोजी(शनिवार) असल्याने कांदा लिलाव फक्त सकाळच्या सत्रात सुरू राहतील तर धान्य लिलाव बंद राहतील.

दिनांक:- 20 रोजी साप्ताहिक सुट्टी(रविवार) असल्याने कांदा व धान्य लिलाव बंद राहतील.मतदानामुळे दिनांक:- 21 रोजी सार्वजनिक सुट्टी (विधानसभा निवडणूक) असल्याने कांदा व धान्य लिलाव बंद राहणार आहेत

Web Title: Afghan onion arrives in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.