भारतात तब्बल ७३ वर्षांनंतर पुन्हा धावणार आफ्रिकेचा चित्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 02:04 AM2020-01-30T02:04:18+5:302020-01-30T15:12:34+5:30
आफ्रिकी देश नामिबियामधून जवळजवळ १२ चित्त्यांचे (नर- मादी) भारतात पुनर्वसन करण्याचा मार्ग खुला झाला आहे.
नाशिक : शिकारीमुळे ७३ वर्षांपूर्वी भारतातील जंगलांमधून नामशेष झालेला चित्ता हा मार्जार कुळाचा वन्यप्राणी पुन्हा एकदा धावताना दिसणार आहे. केंद्र सरकारला चित्त्यांचे पुनर्वसन करण्यास सर्वाेच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. यासाठी आजी-माजी वरिष्ठ वन्यजीव अधिकाऱ्यांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय समिती न्यायालयाने गठित केली आहे. आफ्रिकी देश नामिबियामधून जवळजवळ १२ चित्त्यांचे (नर- मादी) भारतात पुनर्वसन करण्याचा मार्ग खुला झाला आहे. नामिबियादेखील यासाठी सकारात्मक असल्याचे सूत्रांनी सांगितले. न्यायालयाने या पुनर्वसन प्रयोगाचे सर्वाधिकार राष्टÑीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाला सोपविले आहे.
केंद्र सरकारच्या अखत्यारितीत असलेल्या राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाकडून चित्त्यांचे भारतात पुनर्वसन करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर मंगळवारी (दि.२८) न्यायालयाच्या पीठाने निर्णय देत प्राधिकरणाला पुनर्वसनासाठी परवानगी दिली. सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायाधीश बी. आर. गवई, न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाचे या चित्ता पुनर्वसन प्रकल्पावर विशेष लक्ष राहणार आहे.
यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीला न्यायालयाच्या पीठाला वेळोवेळी प्रगतीचा अहवाल सादर करावा लागणार आहे. नेमक्या कुठल्या अभयारण्यात चित्त्यांचे पुनर्वसन करायचे, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. यासाठी सर्वाधिकार न्यायालयाने प्राधिकरणाला दिले आहे. त्यानुसार प्राधिकरणाकडून तत्पूर्वी सर्वेक्षण केले जाणार आहे. चित्त्याचे जीवशास्त्र लक्षात घेत त्यासाठी पोषक असा अधिवास कोणता असेल? याचा अभ्यास करून त्या अभयारण्य क्षेत्राची निवड केली जाणार आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान,गुजरात या तीन राज्यांमधील अभयारण्य क्षेत्रांची नावे चर्चेत आहेत. गठित करण्यात आलेल्या समितीत केंद्र सरकारच्या भारतीय वन्यजीव संस्थेचे धनंजय मोहन, माजी अध्यक्ष डॉ. एम. के. रणजितसिंह झाला यांच्यासह केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या वन्यजीव विभागाच्या अध्यक्षांचा समावेश आहे.
आफ्रिकेच्या तुलनेत भारतीय जंगले विरळ
आफ्रिक न देशांमधील जंगलांची तुलना भारतातील जंगलांशी होऊ शकत नाही, असे अभ्यासक ांचे म्हणणे आहे. तेथील जंगले ही घनदाट व मोठ्या स्वरूपाची आहेत. त्या तुलनेत भारतीय जंगलांचा विस्तार लहान व विरळ ठरतो. काळवीट हे आफ्रि कन चित्त्याचे आवडते खाद्य आहे. भारतीय जंगले ही एक हजार चौरस किलोमीटरमध्ये पसरलेली आहेत.