३६ तासानंतर किसान सभेचे बि-हाड आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 01:57 PM2020-02-26T13:57:53+5:302020-02-26T13:58:08+5:30
दिंडोरी : येथे किसान सभेने पुकारलेल्या बिºहाड आंदोलन काही मागण्यांवर तोडगा निघाल्याने मंगळवारी रात्री मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे महसुल यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
दिंडोरी : येथे किसान सभेने पुकारलेल्या बिºहाड आंदोलन काही मागण्यांवर तोडगा निघाल्याने मंगळवारी रात्री मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे महसुल यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बिºहाड आंदोलन सुरु होते. त्यानंतर बुधवारी किसान सभेचे पदाधिकारी प्रांत डॉ.संदिप आहेर, वन विभागाचे अधिकारी, पोलिस विभाग यांच्याशी चर्चा झाली. त्यात समाधानकारक चर्चा झाली. रेशन कार्डच्याबाबत तहसिल कार्यालयात येणाऱ्या अडचणीवर स्वत: प्रांताधिकाऱ्यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. रेशन कार्ड काढताना अडवणूक होणार नाही असे सांगण्यात आले. भातोडे येथील वनजमिनीचा प्रश्न न्यायालयाच्या निर्णयामुळे अडलेला आहे. अपात्र लाभधारकांच्या वनहक्क दाव्याची पुर्न तपासणी पुन्हा करण्यात येईल त्याबाबत न्यायालयाचे निर्देश पाळण्यात येतील. चंडीकापूर, ओझरखेड, भातोडे आदी ठिकाणी वनविभागाने तोडगा मान्य केला. संजय गांधी योजना कार्यालयामार्फत प्रश्न तातडीने सोडवण्याचे प्रांत डॉ.संदिप आहेर यांनी मान्य केले. किसान सभेचे प्रश्न सोडवण्यासाठी दोन प्रतिनिधींनी सातत्याने तहसिलदारांशी संपर्क साधावा व मार्ग काढावा,रेशन कार्डचा प्रश्न तातडीने सोडण्यात येईल असे आश्वासन प्रांत डॉ.आहेर यांनी दिले. त्यानंतर मंगळवारी रात्री आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी किसन गुजर, रमेश चौधरी, तहसिलदार कैलास पवार, नायब तहसिलदार तांबे आदी उपस्थित होते.