तब्बल ३५ वर्षांनी भरला बारावीचा वर्ग
By admin | Published: September 2, 2016 10:30 PM2016-09-02T22:30:27+5:302016-09-02T22:30:40+5:30
तब्बल ३५ वर्षांनी भरला बारावीचा वर्ग
नामपूर : महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देत सटाणा महाविद्यालयातील १९८० च्या बॅचच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नाशिक येथील पी. जी. फॉर्म येथे घेण्यात आला. या मेळाव्यात याच बॅचचे प्राध्यापक व प्राचार्यांनी या माजी विद्यार्थ्यांचा वर्ग भरविला.
या प्रसंगी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी कोण किती खोडकर होते याच्या आठवणी सांगण्यात आल्या. जमलेल्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याने स्मृतींना बहरत ठेवण्यासाठी फॉर्मच्या परिसरात वृक्षारोपण केले. दीपक नेरकर, कल्पना सोनवणे, डॉ. कीर्ती भामरे यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. तत्कालीन प्राचार्य ब्राह्मणकार, ई. डी. येवला, बी. एम. देवरे, वाय. डी. बेडसे, डी. आर. महाजन यांनी मेळाव्याचा उद्देश कथन करून आपल्या आशीर्वाद मनोगतातून यशस्वी जीवनाचे गमक उलगडले. यावेळी गुरुजनांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यक्तिगत मैत्री घट्ट करण्याबरोबरच एकमेकांच्या अडचणीच्या काळात धावून जाण्याचा संकल्प करण्यात आला. सूत्रसंचालन अॅड. प्रवीण अमृतकर यांनी केले. दीपक नेरकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)