अंदरसूल गावाला चार दिवसानंतर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:42 AM2018-05-19T00:42:51+5:302018-05-19T00:42:51+5:30

अंदरसूल : येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आता जाणवू लागली. अंदरसूल गावाला चार दिवसानंतर पिण्याचे पाणी मिळत आहे.

After 4 days water in the village of Arsurul | अंदरसूल गावाला चार दिवसानंतर पाणी

अंदरसूल गावाला चार दिवसानंतर पाणी

Next

अंदरसूल : येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आता जाणवू लागली. अंदरसूल गावाला चार दिवसानंतर पिण्याचे पाणी मिळत आहे. अंदरसूल गावाच्या वाड्या-वस्त्यावरील विहिरींनी तळ गाठला असून, उत्तरपूर्व भागातील धामणगाव, सायगाव, पांजरवाडी, गारखेडे, भारम, तळवाडे, न्याहारखेडे, कौटखेडे, बोकटे, तळवाडे, डोंगरगाव, भुलेगाव, देवठाण, खामगाव रस्ता, सुरेगाव, देवळाणे, दुगलगाव, गवंडगाव या गावाच्या वाड्या-वस्त्यावरील विहिरींनी तळ गाठला आहे, त्यामुळे टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, बोकटे यात्रेपूर्वीच्या कालव्याच्या पाण्याने नदीपात्रातील बंधारे कोरडेठाक झाले आहेत. तालुक्यात विक्रमी तपमान झाल्याने बंधारे व विहिरींचे पाणी आटले आहे. कालवा लाभक्षेत्रातील सध्या पिण्याइतके पाणी असले तरी एक महिना ते पुरणार नाही.

Web Title: After 4 days water in the village of Arsurul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी