५० वर्षानंतर भरला आठवडे बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 03:08 PM2020-01-20T15:08:00+5:302020-01-20T15:08:09+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील घोटी, वाडिव-हे, टाकेद, व गोंदे दुमाला येथील आठवडे बाजारांच्या धर्तीवर पन्नास वर्षानंतर पहिल्यांदाच साकुर येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून दर रविवारी आठवडे बाजार भरणार आहे.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील घोटी, वाडिव-हे, टाकेद, व गोंदे दुमाला येथील आठवडे बाजारांच्या धर्तीवर पन्नास वर्षानंतर पहिल्यांदाच साकुर येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून दर रविवारी आठवडे बाजार भरणार आहे.रविवारी सकाळी अकरा वाजता सरपंच विनोद आवारी व बचत गटाच्या प्रमुख वाघ तसेच महिला बचत गटाच्या महिला यांच्या हस्ते आठवडे बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.
इगतपुरी तालुक्यातील साकुर हे गाव दहा ते पंधरा गावांशी संपर्क असलेले सर्वात वर्दळीचे गाव म्हणून ओळखले जाते. तसेच या परिसरातील बहुतेक भागात शेतकरी वर्ग असल्यामुळे फ्लावर, कोबी, मिरची, कोथंबीर, टोमॅटो, बटाटे, शेवग्याच्या शेंगा, कडधान्ये, तांदूळ, गहू, बाजरी, डाळी, खाद्यपदार्थ, तूप, मसाला, आदी प्रकारचा भाजीपाला व वस्तू या बाजारपेठेत विक्र ीस येणार असल्यामुळे विक्र ेते व शेतकरी यांना याचा फायदा व्हावा हाच एकमेव उद्देश बाजारपेठ भरविण्याचा असल्याचे सरपंच विनोद आवारी यांनी सांगितले. पहिल्याच दिवशी आलेल्या दुकानदारांचे सरपंच आवारी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. प्रामुख्याने गृहोपयोगी वस्तू, कटलरी, भाजीपाला, भांडी, हार्डवेअर, मिठाई, खाऊची दुकाने, तयार कपडे आदींची दुकाने खरेदीदारांना आपल्याकडे आकर्षित करीत होती.साकुर गावाला जणू काही जञेचे स्वरु पच प्राप्त झाले होते.खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. ग्रामपंचायतीचे कर्मचारी रामदास उगले यांनी या आठवडे बाजाराचे नियोजन केले होते.
यावेळी पोलीस पाटिल शिवाजी सहाणे, तुकाराम सहाणे, शालेय समितीचे अध्यक्ष समाधान सहाणे, उपसरपंच दिनकर सहाणे, ग्रामपंचायत सदस्य विष्णू सहाणे, अनिल उन्हवणे, वैजयंती आवारी, दत्ता आवारी, शोभा सहाणे, मिनाबाई सहाणे, द्रोपदाबाई पावसे, अनिता आवारे आदी उपस्थित होते.