५० वर्षांनंतर भरला आठवडे बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 10:28 PM2020-01-20T22:28:04+5:302020-01-21T00:20:24+5:30

इगतपुरी तालुक्यातील घोटी, वाडीवºहे, टाकेद व गोंदे दुमाला येथील आठवडे बाजारांच्या धर्तीवर पन्नास वर्षांनंतर पहिल्यांदाच साकूर येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून दर रविवारी आठवडे बाजार भरवण्यात येणार आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता सरपंच विनोद आवारी व बचतगटाच्या प्रमुख वाघ तसेच महिला बचतगटाच्या महिला यांच्या हस्ते आठवडे बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.

After 5 years, the market is full for weeks | ५० वर्षांनंतर भरला आठवडे बाजार

साकूर येथे आठवडे बाजाराच्या पहिल्याच दिवशी परिसरातील महिला शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेला भाजीपाला.

Next
ठळक मुद्देसाकूर : दुकानदारांसह ग्राहकांचाही प्रतिसाद

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील घोटी, वाडीवºहे, टाकेद व गोंदे दुमाला येथील आठवडे बाजारांच्या धर्तीवर पन्नास वर्षांनंतर पहिल्यांदाच साकूर येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून दर रविवारी आठवडे बाजार भरवण्यात येणार आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता सरपंच विनोद आवारी व बचतगटाच्या प्रमुख वाघ तसेच महिला बचतगटाच्या महिला यांच्या हस्ते आठवडे बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.
इगतपुरी तालुक्यातील साकूर हे गाव दहा ते पंधरा गावांशी संपर्कअसलेले सर्वात वर्दळीचे गाव म्हणून ओळखले जाते. तसेच या परिसरातील बहुतेक भागात शेतकरीवर्ग असल्यामुळे फ्लावर, कोबी, मिरची, कोथंबीर, टोमॅटो, बटाटे, शेवग्याच्या शेंगा, कडधान्ये, तांदूळ, गहू, बाजरी, डाळी, खाद्यपदार्थ, तूप, मसाला आदी प्रकारचा भाजीपाला व वस्तू या बाजारपेठेत विक्र ीस येणार असल्यामुळे विक्र ेते व शेतकरी यांना याचा फायदा व्हावा हाच एकमेव उद्देश बाजारपेठ भरविण्याचा असल्याचे सरपंच विनोद आवारी यांनी सांगितले. पहिल्याच दिवशी आलेल्या दुकानदारांचे सरपंच आवारी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी पोलीसपाटील शिवाजी सहाणे, तुकाराम सहाणे, शालेय समितीचे अध्यक्ष समाधान सहाणे, उपसरपंच दिनकर सहाणे, ग्रामपंचायत सदस्य विष्णू सहाणे, अनिल उन्हवणे, वैजयंती आवारी, दत्ता आवारी, शोभा सहाणे, मीनाबाई सहाणे, द्रौपदाबाई पावसे, अनिता आवारे आदी उपस्थित होते.

बाजाराला जत्रेचे स्वरूप
प्रामुख्याने गृहोपयोगी वस्तू, कटलरी, भाजीपाला, भांडी, हार्डवेअर, मिठाई, खाऊची दुकाने, तयार कपडे आदींची दुकाने खरेदीदारांना आपल्याकडे आकर्षित करीत होती. साकूर गावाला जणूकाही जत्रेचे स्वरूपच प्राप्त झाले होते. खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. ग्रामपंचायतीचे कर्मचारी रामदास उगले यांनी या आठवडे बाजाराचे नियोजन केले होते.

Web Title: After 5 years, the market is full for weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार