‘गोई’वरून १३ वर्षांनी वाहिले पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 10:29 PM2019-10-31T22:29:25+5:302019-10-31T22:46:30+5:30
मानोरी : परिसरासह सर्वत्र परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मानोरी बुद्रुक येथील सर्वात मोठी नदी असलेल्या गोई नदीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. बंधाऱ्याची उंची कमी अधिक असल्याने १३ वर्षांनंतर प्रथमच बंधाºयावरून पाणी वाहिल्याचे दिसून आले. परिणामी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला असून, सदर बंधाºयाची भिंत एकसारखी बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पंधरा दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस होत आहे. बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरु वात झाली होती. त्यात सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तसेच संध्याकाळी साडेसहा ते रात्री बारा वाजेपर्यंत झालेल्या जोरदार पावसानंतर मंगळवारी पहाटे गोई नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. सन २००६ मध्ये गोई नदीला महापूर आला होता.
या महापुरात नदीवरील अर्धा बंधारा वाहून गेल्याने अर्धा बंधारा लहान तर अर्धा मोठा अशी अवस्था झाली होती. या बंधाºयाची वाहून गेलेली भिंत तत्काळ बांधण्यात आली; मात्र ती अपूर्ण तसेच कमी उंचीची भिंत होती. त्यामुळे काही वर्षांपासून अर्ध्या बंधाºयावरून पाणी वाहत असल्याचे सर्वांना दिसत होते. १३ वर्षांनंतर संपूर्ण बंधाºयावरून पहिल्यांदा पाणी वाहत असल्याने ग्रामस्थांनी गर्दी केली होती. संबंधित प्रशासनाने सदर बंधाºयाची संपूर्ण भिंत एकसारखी बांधून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून, बंधारा एकसारखा झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक होणार आहे.