मेनखिंड शाळेत २० वर्षानंतर विद्यार्थ्यांना मिळाले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 09:07 PM2020-01-06T21:07:19+5:302020-01-06T21:08:07+5:30
सिन्नर : तालुक्यातील मेनखिंड (पिंपळे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून शालेय पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन जेष्ठ शिक्षक अंजना थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
सिन्नर : तालुक्यातील मेनखिंड (पिंपळे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून शालेय पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन जेष्ठ शिक्षक अंजना थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
सन २००१ मध्ये स्थापन झालेल्या या जिल्हा परिषद शाळेत आजपर्यंत पाण्याची सोय नव्हती. त्यामुळे मुलांना आपली तहान भागविण्यासाठी घरूनच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या दप्तरात आणत होते. या बाटल्यामुळे मुलांना अतिरिक्त बोजा पाठीवर सहन करावा लागत होता.
तर शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांची तहान भागविण्यासाठी विहीरीतुन पाणी काढून द्यायचे आणि मुले डोक्यावर सतत पाणी आणायचे. यामुळे मुलांचे शैक्षणिक व शारीरिक नुकसान होत होते.
पांढुर्ली बीटाचे विस्ताराधिकारी राजीव लहामगे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय व्यवस्थापन समितीची सभा घेऊन ग्रामस्थाना एकत्रित करून पाणी योजना सुरू करण्याचे आवाहन केले.
शाळेतील आजी - माजी शिक्षक , पालक आदींनी वर्गणी गोळाकरुन पैसे जमा केले व तेथील गोविंद कातोरे यांच्या विहिरीतुन मोटर आणि सुमारे ७०० मीटर पाइपलाइन टाकून शाळेत पाणी आणले.
काहींनी शाळेला पाण्याच्या टाक्या दिल्याने मुलांची ेपिण्याच्या पाण्याची आता शाळेतच सोय झाल्याने शिक्षक ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्र माचे सूत्रसंचालन शिक्षक अविनाश खेडकर यांनीे तर आभार नीलम वाळुंज यांनी मानले. यावेळी महेश गायकवाड, राजू सानप, बी. एस. माळी, राजेंद्र मगर, सुभाष सदगीर, पोपट सदगीर, प्रशांत भीरे, महेश आहिरे, रवींद्र बेंडकुळे, अनिल पवार, दीपक उगले, गणपत नवले, लहाने, स्वाती बनके, मंगल केदारी, रविन्द्र सातव, रंगनाथ थेटे, रामदास घुगे, हरिभाऊ जाधव, उदय संधान, बोगीर आदी होते.