दीड महिन्यानंतर बाधित पुन्हा दोन आकड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 01:08 AM2022-02-17T01:08:40+5:302022-02-17T01:08:56+5:30
जिल्ह्यातील बाधित संख्येत गत पंधरवड्यापासून वेगाने घट येत असताना बुधवारी (दि.१६) दिवसभरात ९० बाधित आढळून आले आहेत. ३० डिसेंबरनंतर तब्बल दीड महिन्याने पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या दोन आकड्यात आल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
नाशिक : जिल्ह्यातील बाधित संख्येत गत पंधरवड्यापासून वेगाने घट येत असताना बुधवारी (दि.१६) दिवसभरात ९० बाधित आढळून आले आहेत. ३० डिसेंबरनंतर तब्बल दीड महिन्याने पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या दोन आकड्यात आल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात दिवसभरात २०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोना उपचारार्थी रुग्णसंख्येत घट येऊन ती ११६७ वर पोहोचली आहे. दरम्यान जिल्ह्यातील कोराना प्रलंबित अहवालांच्या संख्येत अल्पशी वाढ होऊन ती संख्या १२९२ वर पोहोचली आहे. दरम्यान कोरोनामुक्ततेचे प्रमाण ९७.८८ टक्के असून पॉझिटिव्हीटी रेट २.४२ टक्क्यांपर्यंत खाली आलेला आहे. दरम्यान दिवसभरातील बळींच्या संख्येतही घट आली असून शहरातील एकमेव नागरिकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८८८३ वर पोहोचली आहे.