...अखेर कलानगरचा वीजपुरवठा सुरळीत

By admin | Published: June 14, 2014 01:44 AM2014-06-14T01:44:16+5:302014-06-14T01:59:14+5:30

इंदिरानगर : अखेर कलानगरचा वीजपुरवठा सुरळीत

After all, the power supply of Kalanagar was finally resolved | ...अखेर कलानगरचा वीजपुरवठा सुरळीत

...अखेर कलानगरचा वीजपुरवठा सुरळीत

Next

इंदिरानगर : येथील कलानगर बसथांब्यानजीक असलेल्या रोहित्रामधील बिघाड महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत केल्याने गेल्या महिनाभरापासून सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या रहिवासी व व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले.
कलानगर परिसर तसेच मैत्रविहार, राजलक्ष्मी, ईश्वर पार्क, गगनप्रभा, ओमकार यांसह परिसरातील सोसायट्यांमधील रहिवासी तसेच व्यावसायिक गेल्या महिनाभरापासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्रस्त झाले होते. ऐन उन्हाळ्यात दिवसा तसेच रात्रीच्या वेळी अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले होते. याबाबत नागरिकांनी अनेकदा महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते; परंतु कर्मचारी येऊन तात्पुरता वीजपुरवठा सुरळीत करीत व यानंतर पुन्हा वीज गायब होत होती. गुरुवारी सकाळी येथील रहिवासी व व्यावसायिक जमा झाले. यानंतर त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली व सदर रोहित्र त्वरित दुरुस्त करावे, असे सांगितले. यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी नितीन पगारे यांनी तत्काळ दखल घेत रोहित्रामधील झालेला बिघाड दुरुस्त केला. यामुळे खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आज अधिकाऱ्यांनी पुन्हा पाहणी केली. यावेळी परिसरातील शरद निकम, जितेंद्र मोरे, विकास मगर, भदाणे, चंद्रकांत ठोसर, राज बन्द्रे, भुरे, प्रकाश मेघने, बापू कापसे, श्रीवास्तव, शैलेश पटेल, विराणी, शिंदे आदिंसह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: After all, the power supply of Kalanagar was finally resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.