आश्वासनानंतर मालेगावी रिपाइंचे आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 06:02 PM2019-02-11T18:02:32+5:302019-02-11T18:04:46+5:30
मालेगाव येथील महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर रमाई घरकुल आवास योजनेसंदर्भात सुरू असलेले रिपाइंचे आंदोलन महापालिकेच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
मालेगाव : येथील महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर रमाई घरकुल आवास योजनेसंदर्भात सुरू असलेले रिपाइंचे आंदोलन महापालिकेच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
रिपाइंचे कार्याध्यक्ष राजेश पटाईत यांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू करण्यात आले होते. मनपाचे बांधकाम अभियंता सचिन माळवाळ यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत घरकुल योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. लाभार्थींची बैठक घेऊन बांधकाम परवानगीची प्रकरणे दाखल करून घेऊ, असे आश्वासन दिले. आश्वासन मिळाल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भारत चव्हाण, अभिषेक सोनवणे, दादाजी महाले, दिलीप अहिरे,
विष्णू शेजवळ, सचिन अहिरे, समाधान वाघ, नाना पवार, भारत बोराळे, बाळू बिºहाडे, आनंद खैरनार, मंगेश निकम, सुरेश सोनवणे, शरद यशोद आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.