आश्वासनानंतर ग्रामस्थांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:11 AM2020-12-23T04:11:23+5:302020-12-23T04:11:23+5:30
खादगाव ग्रामपंचायत हद्दीतील १२०० लोकसंख्या असलेल्या दलितवस्तीसाठी वारंवार मागणी करूनही रस्ता मिळत नसल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष ...
खादगाव ग्रामपंचायत हद्दीतील १२०० लोकसंख्या असलेल्या दलितवस्तीसाठी वारंवार मागणी करूनही रस्ता मिळत नसल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दिनकर यमगर (पहिलवान) व कमलाकर आहिरे, भारत आहिरे, विलास मोरे व इतर नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.
रस्त्यावर खासगी अतिक्रमण असल्याचा दावा उपोषणार्थींनी केला होता. या दाव्याला आव्हान देताना सागर वडक्ते व इतर ११ जणांनी मोजणी करून अतिक्रमण आहे, हे सिद्ध करून द्यावे असे नमूद केले. रस्ता हा आमच्या खासगी मिळकतीतून जातो. परंतु आम्ही कोणास अडवत नाही असेही वडक्ते व इतरांनी चौकशीदरम्यान नमूद केले असले तरी येथे पक्की सडक व्हावी अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे.
-----------------
पक्क्या रस्त्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले खादगावचे ग्रामस्थ. (२२ नांदगाव१)