पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीतील सत्तेनंतर काँग्रेसला उतरती कळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:19 AM2021-08-14T04:19:15+5:302021-08-14T04:19:15+5:30
आताही राज्यात महापालिकांच्या निवडणुकांचे पडघम वाजत असताना नाशिकमध्ये दोन्ही पक्षांची अवस्था फार चांगली नाही. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे राष्ट्रवादीची ...
आताही राज्यात महापालिकांच्या निवडणुकांचे पडघम वाजत असताना नाशिकमध्ये दोन्ही पक्षांची अवस्था फार चांगली नाही. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे राष्ट्रवादीची मदार त्यांच्यावर आहे. काँग्रेस पक्षात तसा नेता नाही. त्यातच राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही स्थानिक पातळीवर मात्र तिन्ही पक्षांचा एकोपा नाही. मध्यंतरी तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष आपल्याला जमेला धरत नाहीत, अशी तक्रार स्थानिक कार्यकर्त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती.
राज्यात काँग्रेसची सत्ता असतानाच नाशिक महापालिकेच्या निवडणुका १९९२ मध्ये झाल्या. त्यावेळी एकूण ८५ पैकी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक ३८ नगरसेवक निवडून आले होते; तर २७ अपक्ष निवडून आले होते. त्यावेळी अपक्षांच्या मदतीने सलग तीन वर्षे आणि एकदा शेवटचे एक वर्ष असे चार वेळा महापौरपद मिळाले. त्यावेळी एक वर्ष कालावधीसाठीच महापौरपद होते.
१९९७ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ३२ नगरसेवक निवडून आले. परंतु त्यावेळी भाजप-शिवसेना आणि अपक्ष एकत्र आल्याने सलग दोन वर्षे युतीचे वसंत गिते आणि अशोक दिवे यांनी महापौरपद भूषवले. त्यानंतर मात्र युतीतील फाटाफूट काँग्रेस पक्षाच्या पथ्यावर पडली आणि डॉ. शोभा बच्छाव या महापौर म्हणून विराजमान झाल्या. नेमक्या त्याचवेळी महापौरपदाचा कालावधी अडीच वर्षे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यामुळे जवळपास तीन वर्षे महापौरपद त्यांना भूषवता आले. त्यानंतर मात्र पक्षाची उतरती कळा सुरू झाली. २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत १६ तर २००७ मध्ये २१ आणि २०१२ मध्ये १५ तर २००७ मध्ये सर्वात नीचांकी कामगिरी काँग्रेस पक्षाने केली आणि सहा नगरसेवक निवडून आले आहेत.
इन्फो..
काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे एक सदस्यीय प्रभागाची मागणी केली होती. तसे झाल्यास नाशिकमध्ये १२२ प्रभाग होतील, तेवढे उमेदवार पक्षाकडे आहेत काय, असा प्रश्न आहे.
इन्फो...
काँग्रेस पक्षाची आत्तापर्यंतची वाटचाल
१९९२- ३८
१९९७- ३२
२००२- १६
२००७- २१
२०१२- १५
२०१७- ६