दिवाळीनंतर टपाल विभागाचे ‘घर घर मोदी’

By sandeep.bhalerao | Published: October 12, 2018 01:09 AM2018-10-12T01:09:33+5:302018-10-12T01:11:38+5:30

देशातील खेड्यापाड्यापर्यंत टपाल खात्याचे जाळे विस्तारले असल्याने गावागावातील नागरिकांना पोस्ट बॅँकेत सामावून घेण्यासाठी गेल्या सप्टेंबरमध्ये मोदींनी ‘आपका बॅँक, आपके द्वार’ योजनेची घोषणा केली आणि आता दिवाळीनंतर मोदींचा हाच संदेश घेऊन घरोघरी टपाल कर्मचारी पोहचणार आहेत.देशातील खेड्यापाड्यापर्यंत टपाल खात्याचे जाळे विस्तारले असल्याने गावागावातील नागरिकांना पोस्ट बॅँकेत सामावून घेण्यासाठी गेल्या सप्टेंबरमध्ये मोदींनी ‘आपका बॅँक, आपके द्वार’ योजनेची घोषणा केली आणि आता दिवाळीनंतर मोदींचा हाच संदेश घेऊन घरोघरी टपाल कर्मचारी पोहचणार आहेत.

After the Diwali, the postal department of 'Ghar Ghar Modi' | दिवाळीनंतर टपाल विभागाचे ‘घर घर मोदी’

दिवाळीनंतर टपाल विभागाचे ‘घर घर मोदी’

Next
ठळक मुद्देनिमित्त टपाल बॅँकेचे : घराघरात पोहचणार कर्मचारी

नाशिक : देशातील खेड्यापाड्यापर्यंत टपाल खात्याचे जाळे विस्तारले असल्याने गावागावातील नागरिकांना पोस्ट बॅँकेत सामावून घेण्यासाठी गेल्या सप्टेंबरमध्ये मोदींनी ‘आपका बॅँक, आपके द्वार’ योजनेची घोषणा केली आणि आता दिवाळीनंतर मोदींचा हाच संदेश घेऊन घरोघरी टपाल कर्मचारी पोहचणार आहेत.
गेल्या १ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इंडिया पोस्ट पेमेंट बॅँकेचे उद्घाटन केले आणि देशभरातील ३३ शहरांमध्ये या बॅँकेच्या कामकाजाला प्रारंभ झाला. भारतीय डाक विभागाच्या या महत्त्वाकांक्षी टपाल बॅँकेसाठी पंतप्रधान मोदींनी अधिक व्यापक संकल्पना मांडताना टपाल कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक घरातून टपाल खाते उघडण्याची मोहीम राबविण्याचा मंत्र दिला होता.
त्यानुसार आता या ३३ शहरांतील मुख्य टपाल कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाºयांपासून पोस्टमनपर्यंत सर्वांना घरोघरी बॅँकेची योजना पोहचविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणानंतर हे कर्मचारी गावागावात मोदींची ‘आपका बॅँक, आपके द्वार’ संकल्पना पोहचविणार असून, येत्या डिसेंबरअखेर प्रत्येक गावागावात मोदींचा संदेश पोहचविण्याचा व्यापक कार्यक्रम आखण्यात आलेला आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शंका
गावखेड्यातील माणसांपर्यंत टपाल खाते आणि त्या माध्यमातून बॅँकिंग सुविधा पोहचविण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम असला तरी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सरकारची (मोदींची) छबी पोहचविण्यासाठीचीही ही युक्ती मानली जात आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची ही शक्कल असल्याची कुजबूज मात्र लपून राहिलेली नाही.

Web Title: After the Diwali, the postal department of 'Ghar Ghar Modi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.