अखेर पंधरा वर्षांनंतर नाशिकमधील वडाळा शिवारातील शंभर फुटी रस्त्याने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 03:25 PM2017-12-18T15:25:20+5:302017-12-18T15:26:57+5:30

झोपडपट्टी भुईसपाट : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई

 After fifteen years, breathing was done in 100 feet of road in Wadala Shiva in Nashik. | अखेर पंधरा वर्षांनंतर नाशिकमधील वडाळा शिवारातील शंभर फुटी रस्त्याने घेतला मोकळा श्वास

अखेर पंधरा वर्षांनंतर नाशिकमधील वडाळा शिवारातील शंभर फुटी रस्त्याने घेतला मोकळा श्वास

googlenewsNext
ठळक मुद्दे महापालिकेने राबविलेल्या या मोहिमेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी घरकुलांचा ताबा घेऊनही अनेकांनी आपल्या झोपड्या मात्र कायम ठेवल्या होत्या

इंदिरानगर -- वडाळागावातील पांढरी आई चौक ते मांगीरबाबा चौक या शंभर फुटी रस्त्याने अखेर पंधरा वर्षानंतर मोकळा श्वास घेतला. महापालिकेने सोमवारीही (१८) अतिक्रमणविरोधी मोहीम राबवत सुमारे ४० झोपड्या जमिनदोस्त केल्या. महापालिकेने राबविलेल्या या मोहिमेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे.
दहा वर्षांपूर्वी मुंबई आग्रा महामार्ग आणि पुणे महामार्ग यांना जोडणारा शंभरफुटी रस्ता बनण्यात आला होता. परंतु पांढरी आई चौक ते मांगीरबाबा चौक या शंभरफुटी रस्त्याच्या मधोमध आणि दुतर्फा अनिधकृत झोपड्या असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असे. या अतिक्रमणामुळे लहान मोठे अपघात होऊन वादविवादाच्याही घटना घडत होत्या. सदर झोपडपट्टीतील लाभार्थ्यांना महापालिकेने लगतच उभारलेल्या इमारतीत घरकुल उपलब्ध करुन दिले होते. परंतु, घरकुलांचा ताबा घेऊनही अनेकांनी आपल्या झोपड्या मात्र कायम ठेवल्या होत्या. अखेर महापालिकेने शनिवारी (दि.१६) झोपड्यांवर जेसीबी चालविला तर उर्वरित कारवाई सोमवारी करण्यात आली. शनिवारी ३५० झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या. सोमवारी पुन्हा सकाळी मोहीम राबवून सुमारे ४० झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. सुमारे पाच तास मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक फुलदास भोये, अतिक्र मण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, सुनिता कुमावत यांच्यासह मनपा अधिकारी यांचेसह १०० पोलिस कर्मचारी तैनात होते.
भंगारवाल्यांची कमाई
महापालिकेने संपूर्ण झोपडपट्टी भुईसपाट केली. मोहिमेनंतरही रहिवाशांनी उद्धवस्त झोपड्यांमधून आपले सामान शोधण्यासाठी गर्दी केली होती तर भंगार व्यावसायिकांनीही चांगली कमाई केली. भंगार खरेदी करण्यासाठी काही व्यावसायिक चकरा मारत होते. अनेकांनी सामान काढून घेत दुसरीकडे आसरा शोधण्यास सुरुवात केली तर महापालिकेने तातडीने बांधकामाचे ढिगारे हटविण्यास सुरुवात केली.
 

Web Title:  After fifteen years, breathing was done in 100 feet of road in Wadala Shiva in Nashik.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.