पंधरा वर्षांनंतर शंभरफुटी मार्ग मोकळाझोपडपट्टी भुईसपाट : महापालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:20 AM2017-12-19T00:20:04+5:302017-12-19T00:23:31+5:30

इंदिरानगर : वडाळागावातील पांढरी आई चौक ते मांगीरबाबा चौक या शंभरफुटी रस्त्याने अखेर पंधरा वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला. महापालिकेने सोमवारीही (१८) अतिक्रमणविरोधी मोहीम राबवत सुमारे ४० झोपड्या जमीनदोस्त केल्या. महापालिकेने राबविलेल्या या मोहिमेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे.

After fifteen years, the Mokalazoppatti Bhuissapat on the Shabsar-Bugti route: Anti-encroachment campaign of the municipality | पंधरा वर्षांनंतर शंभरफुटी मार्ग मोकळाझोपडपट्टी भुईसपाट : महापालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम

पंधरा वर्षांनंतर शंभरफुटी मार्ग मोकळाझोपडपट्टी भुईसपाट : महापालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम

Next
ठळक मुद्देपंधरा वर्षांनंतर शंभरफुटी मार्ग मोकळाझोपडपट्टी भुईसपाट : महापालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम

इंदिरानगर : वडाळागावातील पांढरी आई चौक ते मांगीरबाबा चौक या शंभरफुटी रस्त्याने अखेर पंधरा वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला. महापालिकेने सोमवारीही (१८) अतिक्रमणविरोधी मोहीम राबवत सुमारे ४० झोपड्या जमीनदोस्त केल्या. महापालिकेने राबविलेल्या या मोहिमेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे.
दहा वर्षांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्ग आणि पुणे महामार्ग यांना जोडणारा शंभरफुटी रस्ता बनवण्यात आला होता. परंतु पांढरी आई चौक ते मांगीरबाबा चौक या शंभरफुटी रस्त्याच्या मधोमध आणि दुतर्फा अनधिकृत झोपड्या असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असे. या अतिक्रमणामुळे लहान-मोठे अपघात होऊन वादविवादाच्याही घटना घडत होत्या. वारंवार या रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरणाचा प्रश्नही चर्चेत येत होता. मात्र रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या झोपड्या आणि नागरिकांचे पक्के बांधकामांचे अतिक्रमण अडथळा ठरत होते. मात्र शनिवारपासून महापालिकेने हाती घेतलेल्या झोपडपट्टी अतिक्रमण निर्मुलन मोहिमेमुळे श्रीश्री रविशंकर या शंभरफुटी मार्गाला सावित्रीबाई फुले झोपडपट्टीत लागलेले ग्रहण सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.भंगारवाल्यांची कमाईमहापालिकेने संपूर्ण झोपडपट्टी भुईसपाट केली. मोहिमेनंतरही रहिवाशांनी उद्ध्वस्त झोपड्यांमधून आपले सामान शोधण्यासाठी गर्दी केली होती, तर भंगार व्यावसायिकांनीही चांगली कमाई केली. भंगार खरेदी करण्यासाठी काही व्यावसायिक चकरा मारत होते. अनेकांनी सामान काढून घेत दुसरीकडे आसरा शोधण्यास सुरुवात केली, तर महापालिकेने तातडीने बांधकामाचे ढिगारे हटविण्यास सुरुवात केली.सदर झोपडपट्टीतील लाभार्थ्यांना महापालिकेने लगतच उभारलेल्या इमारतीत घरकुल उपलब्ध करून दिले होते. परंतु, घरकुलांचा ताबा घेऊनही अनेकांनी आपल्या झोपड्या मात्र कायम ठेवल्या होत्या. अखेर महापालिकेने शनिवारी (दि.१६) झोपड्यांवर जेसीबी चालविला तर उर्वरित कारवाई सोमवारी करण्यात आली.
शनिवारी ३५० झोपड्या तर सोमवारी पुन्हा मोहीम राबवून सुमारे ४० झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. याप्रसंगी पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, सुनीता कुमावत यांच्यासह मनपा अधिकारी यांच्यासह १०० पोलीस कर्मचारी तैनात होते.

Web Title: After fifteen years, the Mokalazoppatti Bhuissapat on the Shabsar-Bugti route: Anti-encroachment campaign of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.