नाशिकमध्ये चार फेऱ्यांनंतरही 11 हजार विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 06:51 PM2018-08-17T18:51:47+5:302018-08-17T18:52:53+5:30

अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी चार नियमित फेºया झाल्यानंतरही विविध महाविद्यालयांतील सुमारे सात हजार जागा रिक्त असून जवळपास ११ हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्र्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने विशेष प्रवेशफेरी घेण्याचे नियोजन केले असून, त्यासाठी शनिवारी (दि. १८ ) गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. 

After four rounds in Nashik, 11 thousand students await eleven entrants | नाशिकमध्ये चार फेऱ्यांनंतरही 11 हजार विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतिक्षेत

नाशिकमध्ये चार फेऱ्यांनंतरही 11 हजार विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतिक्षेत

googlenewsNext
ठळक मुद्देअकरावी प्रवेशासाठी 11 हजार विद्यार्थ्यांना प्रतिक्षाविशेष फेरीसाठी 18 ऑगस्टला गुणवत्ता यादी

 नाशिक  : अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी चार नियमित फेºया झाल्यानंतरही विविध महाविद्यालयांतील सुमारे सात हजार जागा रिक्त असून जवळपास ११ हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्र्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने विशेष प्रवेशफेरी घेण्याचे नियोजन केले असून, त्यासाठी शनिवारी (दि. १८ ) गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. 
विशेष फेरीत प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक राहणार आहे. अद्याप प्रवेश अर्जच करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी देण्यात आली होती. तसेच, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रियेचा भाग एक व भाग दोन असे दोन्ही भरले, परंतु, गुणवत्ता याद्यांमध्ये निवड झाली नाही, अशा विद्यार्थ्यांनाही विशेष फेरीपूर्वी पसंतीक्रम बदलण्याची अखेरची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. अकरावीच्या प्रवेशासाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत आतापर्यंत १६ हजार ३४० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून ११ हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु, प्रवेशासाठी केवळ सात हजार जागा शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. विशेष फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी १८ ते २१ आॅगस्टपर्यंत मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेशास जाण्यापूर्वी संकेतस्थळावर जाऊन आपल्या लॉगिनमधून 'प्रोसीड'वर क्लिक करावे. त्यानंतर अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून ती महाविद्यालयात प्रवेशासाठी सादर करावी लागणार आहे. 
 जागा वाढण्याची शक्यता
अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश विशेष फेरीसाठी सुमारे सहाशे ते साडेसहाशे जागा वाढण्याची शक्यता आहे. अल्पसंख्याक कोट्यातील जागा रिक्त राहिल्याने संबंधित विद्यालयांनी त्यांच्या जागा प्रवेशप्रक्रियेच्या संकेतस्थळावर अपलोड केल्या असून, विद्यार्थ्यांसाठी आता अधिक सहाशे जागा उपलब्ध होणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. 

 

 

Web Title: After four rounds in Nashik, 11 thousand students await eleven entrants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.