दीर्घ कालावधी नंतर चांदोरी चंदेरी दुनियेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 04:23 PM2020-10-03T16:23:11+5:302020-10-03T16:26:33+5:30
चांदोरी : कोरोनामुळे शासकीय लॉक डाऊन सुरू झाले. मुंबई पुणे सातारा भागासह सर्वच ठिकाणचे मालिका चित्रपटाचे चित्रीकरण बंद झाले. त्या वेळी नाशिकसह परिसरात रु ग्णांचे प्रमाण कमी असल्याने परिसरात चिॠीकरण करण्याची मागणी झाली. नाशिक येथील एकदंत लाईन प्रोड्युसरचे अमित कुलकर्णी यांनी चांदोरी येथे भेट देऊन ‘आफत ए इश्क’ या चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा मनोदय व्यक्त केला दोन दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले.
चांदोरी : कोरोनामुळे शासकीय लॉक डाऊन सुरू झाले. मुंबई पुणे सातारा भागासह सर्वच ठिकाणचे मालिका चित्रपटाचे चित्रीकरण बंद झाले. त्या वेळी नाशिकसह परिसरात रु ग्णांचे प्रमाण कमी असल्याने परिसरात चित्रीकरण करण्याची मागणी झाली. नाशिक येथील एकदंत लाईन प्रोड्युसरचे अमित कुलकर्णी यांनी चांदोरी येथे भेट देऊन ‘आफत ए इश्क’ या चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा मनोदय व्यक्त केला दोन दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले.
यात अभिनेत्री इला अरु ण, नेहा शर्मा, अभिनेता नमीत दास, दीपक डोब्रियल, दर्शन जरीवाल आदींसह स्मिता प्रभू, पल्लवी कदम आदींची मुख्य भूमिका आहे.
सध्या एक्सल व्हिजन झी स्टुडिओ ओरिजिनलने सुमित खुराणा व प्रणव शास्त्री यांच्या माध्यमातून या चित्रपटाचे चित्रीकरण चांदोरी मध्ये संपन्न होऊन ७० हुन अधिक युवकांना सेट उभारणी, एकोमोडेशन, वाहतूक याकामी येथील रोजगार प्राप्त झाला.
दिग्दर्शक इंद्रजित नटोजी तर लाईन प्रोड्यूसर म्हणून नाशिकच्या एकदंत फिल्मचे अमित कुलकर्णी हे काम बघत आहे. सस्पेन्स व हॉरर चित्रपट असल्याने कमी कालावधीत संपूर्ण नाशिक जिल्ह्यात याचे चित्रीकरण पार पडले.
दरम्यान निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी पाहणी करून कोरोना संबंधीच्या सुरक्षेचा आढावा घेतला. सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डी एच शिंदे, एच बी गरु ड, पी टी मुंडे आदींनी बंदोबस्त ठेवला होता.
प्रतिक्रि या
चांदोरीमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करून अनेक दिवसांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले गेलं. यामुळं स्थानिकांना रोजगार मिळाला.
- किसन जाधव, नाव चालक.
चांदोरी सह संपुर्ण गोदाकाठ भागात चित्रिकारणास वाव असून यापुढेही प्राधान्य दिले जाईल
-अमति कुलकर्णी, चित्रपट निर्माता, (फोटो ०३ चांदोरी)