नियंत्रण सुटल्याने कठडे तोडून ट्रक नदीत

By admin | Published: February 18, 2016 10:21 PM2016-02-18T22:21:50+5:302016-02-18T22:22:28+5:30

आठ जखमी : ओझरखेडजवळील घटना

After losing control, due to the breakdown of the truck and in the truck river | नियंत्रण सुटल्याने कठडे तोडून ट्रक नदीत

नियंत्रण सुटल्याने कठडे तोडून ट्रक नदीत

Next

वणी : ओझरखेडजवळील उनंदा नदी पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने
कठडा तोडून ट्रक नदीत कोसळल्याने आठजण जखमी झाले असून, जखमींमध्ये पाच महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे.
गुरुवारी दुपारी खताच्या गोण्या घेऊन कळवणकडे जाणाऱ्या ट्रकच्या (एमएच १५ जी ८०००) चालकाचे ओझरखेडजवळील उनंदा नदीपुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाच्या कठड्याला धडक देत ट्रक नदीत कोसळला. ट्रकमधून प्रवास करणारे चंद्रकला सुदर्शन येडे (४०), छाया वाल्मीक बोराडे (४०), उषा अनिल तावरे (३०), सुनीता भगवान साळवे (३५), इंदूबाई बंडू सपकाळ (५५) सर्व रा. नाशिक, कुसुम बाळू लाखे (४०) रा. जेलरोड, नाशिकरोड, लक्ष्मण मारुती गुडेकर (६०) रा.जालना, किशोर बाबूराव डोंगरे (३२) असे आठ प्रवासी जखमी झाले. जखमींना राजेश परदेशी व सोनू देशमुख यांनी त्वरित वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातात ट्रकचे मोठी नुकसान झाले असून, जखमी प्रवासी व्यवसायानिमित्त कळवण येथे जात होते. याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: After losing control, due to the breakdown of the truck and in the truck river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.