नोटाबंदीच्या निर्णयानंतर दररोज नवीन घोषणा बँक कर्मचाºयांवरील ताण अद्यापही कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 01:33 AM2017-11-11T01:33:06+5:302017-11-11T01:34:05+5:30

नोटाबंदीच्या निर्णयानंतर दररोज नवीन घोषणा केल्या जात असल्याने त्यांची अंमलबजावणी करताना नाकीनव आलेल्या बँक कर्मचाºयांना प्रतिदिन १२ ते १४ तास जादा काम करूनही ग्राहकांचा रोष सहन करावा लागला़ पैसे जमा करण्यासाठीची मोठी रांग व बँकामध्ये फेक करन्सी डिटेक्शन मशीनचा अभाव यामुळे ग्राहकांकडून स्वीकारलेल्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे पाठविल्यानंतर त्यामध्ये काही नोटा बनावट आढळून आल्या़ बँकांनी या बनावट नोटांची भरपाई करावी, असे पत्र रिझर्व्ह बँकेकडून पाठविण्यात आले आहे़

After the nail-breaking decision, the new announcement of the bank employees remains unchanged! | नोटाबंदीच्या निर्णयानंतर दररोज नवीन घोषणा बँक कर्मचाºयांवरील ताण अद्यापही कायम!

नोटाबंदीच्या निर्णयानंतर दररोज नवीन घोषणा बँक कर्मचाºयांवरील ताण अद्यापही कायम!

Next
ठळक मुद्देबनावट नोटांची रक्कम भरून देण्याची वेळकर्मचाºयांना ग्राहकांकडून शिवीगाळ दिवसेंदिवस कामाचा ताण वाढतो आहे़

नाशिक : नोटाबंदीच्या निर्णयानंतर दररोज नवीन घोषणा केल्या जात असल्याने त्यांची अंमलबजावणी करताना नाकीनव आलेल्या बँक कर्मचाºयांना प्रतिदिन १२ ते १४ तास जादा काम करूनही ग्राहकांचा रोष सहन करावा लागला़ पैसे जमा करण्यासाठीची मोठी रांग व बँकामध्ये फेक करन्सी डिटेक्शन मशीनचा अभाव यामुळे ग्राहकांकडून स्वीकारलेल्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे पाठविल्यानंतर त्यामध्ये काही नोटा बनावट आढळून आल्या़ बँकांनी या बनावट नोटांची भरपाई करावी, असे पत्र रिझर्व्ह बँकेकडून पाठविण्यात आले आहे़ त्यामुळे जादा कामाचा मोबदला तर सोडाच शिवाय बनावट नोटांची रक्कम भरून देण्याची वेळ बँकांवर अर्थात कर्मचाºयांवर आली आहे़
नोटाबंदीच्या निर्णयानंतर सुरुवातीचे आठ दिवस १२ ते १४ तास, त्यानंतर जानेवारीपर्यंत दररोज दहा तास कर्मचाºयांनी काम केले़ प्रतिदिन बदलणारे निर्णय नागरिकांना सांगितल्यानंतर कर्मचाºयांना ग्राहकांकडून शिवीगाळ केली जात असे़ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले, विवाहासाठी दीड लाख रुपये देण्याचे आदेश सरकारने दिले, मात्र बँकेकडे पैसेच नसायचे़ त्यात पैसे देण्याच्या अटी या क्लिष्ट व अव्यवहार्य होत्या़ बँकेत मोठ्या संख्येने हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी येत असल्याने बँकेतील सर्वच कर्मचारी कॅशियरच्या भूमिकेत होते़ त्यातच बनावट नोटा ओळखण्याचे फेक नोट मशीनही बँकाकडे उपलब्ध नसल्याने प्रत्येक नोटेची तपासणी करणेही शक्य नव्हते़ बँकेत भरलेल्या हजार-पाचशेच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे पाठविल्यानंतर करन्सी चेकमध्ये काही बनावट नोटाही आढळून आल्या़ या बनावट नोटांच्या रक्कमेची भरपाई संबंधित बँक वा शाखेने करावी असे पत्र रिझर्व्ह बँकेने पाठविले आहे़ यामुळे ग्राहकांना सेवा देणाºया बँकेतील कॅशियर व कर्मचारी यांना या रकमेची भरपाई आपल्या वेतनातून करावी लागणार असून, काही बँकाकडून ती वसूलही करण्यात आली़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँक कर्मचारी व अधिकारी यांच्या कामाची कोरडी स्तुती केली; जादा कामाचा मोबदला दिलाच नाही असे बँक कर्मचारी सांगतात़ प्रत्यक्षात तीन महिने जादा काम करूनही केवळ सुरुवातीच्या तीन दिवसांच्या जादा कामाचे वेतन कर्मचाºयांना दिले गेले तर केवळ तीनच बँकांनी दीड महिन्यांचे जादा कामाचे वेतन दिले उर्वरित बँकांनी मात्र सरळ हात वर केले़ नोटबंदीचा निर्णय हा सरकारचा असला तरी हे आपलेच मिशन असल्याप्रमाणे बँकांनी काम केले़ ग्राहकांच्या खात्यात पैसे असूनही बँकांना ते देता येत नव्हते़ पाच हजार, दहा हजार रुपयेच देण्याची मर्यादा त्यात दोन हजारांची नोटेच्या सुट्यांची समस्या यामुळे ग्राहक कर्मचाºयांनाच शिव्या द्यायचे़ नोटाबंदीमुळे बँकेचे कर्जदार अडचणीत आल्याने ते कर्जाची परतफेड करू शकले नाही व एनपीएची रक्कम वाढली़ मात्र, या कालावधीत बँकांमधील डिपॉझिट वाढल्याने ग्राहकाला व्याज द्यावे लागले़ थोडक्यात नोटाबंदीमुळे बँक व्यवसायाचे जे कंबरडे मोडले त्यातून ती अजूनही सावरलेली नाही़ सरकारने सुरू केलेले डिजिटलायझेशन, आधार लिंक यांसारख्या कामांमुळे कर्मचाºयांचे काम वाढले आहे़ मात्र नोकरभरती बंद असल्याने दिवसेंदिवस कामाचा ताण वाढतो आहे़ 

Web Title: After the nail-breaking decision, the new announcement of the bank employees remains unchanged!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.